वृत्तसंस्था
मॉस्को : रशियात राष्ट्रपती निवडणुकीच्या मतदानादरम्यान जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. युक्रेन सीमेला लागून असलेल्या बेलगोरोड शहरात पुतिनविरोधी लोकांनी अनेक ठिकाणी आग लावली. त्याचवेळी राजधानी मॉस्कोमध्ये लोकांनी अनेक मतदान केंद्रांची तोडफोड केली. हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 8 जणांना ताब्यात घेतले आहे.Violence in Russia’s Presidential Election; Arson along Ukraine border; 8 people detained
रशियामध्ये 15 मार्चपासून राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली. पहिल्यांदाच तीन दिवस मतदान होत आहे. कोणत्याही गुन्हेगारी प्रकरणात तुरुंगवासाची शिक्षा भोगत नसलेले रशियन नागरिक 17 मार्चपर्यंत मतदान करू शकतात. त्याच वेळी, मॉस्कोच्या वेळेनुसार 17 मार्चच्या रात्रीपर्यंत निकाल जाहीर केले जाऊ शकतात.
महिलेने मतदान केंद्रावर शाई ओतली
एपी या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सेंट पीटर्सबर्ग येथील शाळेत एका मुलीने मतदान केंद्राला आग लावली. पोलिसांनी सांगितले की, 20 वर्षीय तरुणीने पुतिन यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी आग लावली. तिला ताब्यात घेण्यात आले आहे.
त्याचवेळी राजधानी मॉस्कोमध्ये एका महिलेने मतपेटीत शाई टाकली. मॉस्कोमधील इतर मतदान केंद्रांनाही आग लावण्यात आली. असेच कृत्य करणाऱ्या आणखी एका महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले. येथे शाई ओतणाऱ्या महिलेला निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी ताब्यात घेण्यात आले.
सेंट पीटर्सबर्ग आणि मॉस्कोशिवाय व्होरोनेझ, कराचे-चेरकेसिया आणि रोस्तोव शहरातूनही लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. खंटी-मानसीच्या सायबेरियन भागात एका महिलेने मतपेटी जाळण्याचा प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App