Vijay Rupani Profile : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर त्यांना राज्याची सूत्रे सोपवण्यात आली होती. विजय रूपाणी हे अमित शहा यांचे जवळचे मानले गेले जातात. बनिया-जैन समाजातून आलेल्या रूपाणी यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते. Vijay Rupani Profile Know About Gujrat CM vijay Rapani Political Journey
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी नुकताच राजीनामा दिला आहे. आनंदीबेन पटेल यांच्यानंतर त्यांना राज्याची सूत्रे सोपवण्यात आली होती. विजय रूपाणी हे अमित शहा यांचे जवळचे मानले गेले जातात. बनिया-जैन समाजातून आलेल्या रूपाणी यांचा जन्म म्यानमारमध्ये झाला. आणीबाणीच्या काळात त्यांना तुरुंगातही जावे लागले होते.
विजय रूपाणी आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे खूप खचले होते. दीड दशकापूर्वी जेव्हा ही दु:खद घटना घडली, तेव्हा त्यांनी राजकारणातून संन्यास घेण्याचा विचार केला होता.
केशुभाई पटेल मुख्यमंत्री असताना रूपाणी यांना निवडणूक जाहीरनामा समितीचे अध्यक्ष करण्यात आले होते. 2007 आणि 2012 च्या विधानसभा निवडणुकीत सौराष्ट्र विभागातील अनेक जागांवर त्यांनी पक्षाला विजयाकडे नेले.
2006 ते 2012 पर्यंत ते राज्यसभेचे खासदारही होते. 1971 मध्ये जनसंघामध्ये सामील झालेल्या रुपाणी यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात केली होती.
रूपाणी यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष काल गुजरातला पोहोचले होते. यानंतरच ते राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. राज्यपालांना भेटल्यानंतर रुपाणी यांनी स्वतः राजीनामा देण्याची घोषणा केली. दरम्यान, 2022 मध्ये गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत.
गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांची भेट घेतल्यानंतर रूपाणी यांनी आपला राजीनामा सादर केला. राजीनामा दिल्यानंतर प्रसारमाध्यमांना संबोधित करताना रूपाणी म्हणाले, ‘माझ्यासारख्या कार्यकर्त्याला गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाची महत्त्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी भारतीय जनता पक्षाचे आभार व्यक्त करतो. माझ्या कार्यकाळात मला ही जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडताना पंतप्रधान मोदींकडून विशेष मार्गदर्शन मिळत आले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली गुजरातने नवीन आयामांना स्पर्श केला आहे.
ते पुढे म्हणाले, ‘गुजरातसाठी मला जी काही संधी मिळाली त्यासाठी मी माननीय पंतप्रधानांचा आभारी आहे. आता हा प्रवास नव्या नेतृत्वाखाली पुढे गेला पाहिजे. हे लक्षात घेऊन मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. कार्यकर्त्याची जबाबदारी काळानुसार बदलत राहणे ही भाजपची परंपरा आहे. पक्षाने जी जबाबदारी दिली आहे, ती कार्यकर्ते पूर्ण समर्पणाने पार पाडतात.”
Vijay Rupani Profile Know About Gujrat CM vijay Rapani Political Journey
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App