राम मंदिर आंदोलनाचे अग्रणी लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशींना विश्व हिंदू परिषदेचे निमंत्रण!!

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : राम मंदिर आंदोलनाचे अग्रणी लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांना विश्व हिंदू परिषदेने अयोध्येतील श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे. विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी आपल्या ट्विटर हँडल वरून ही माहिती दिली. त्यांनी स्वतः विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांबरोबर लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन 22 जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी आपण कार्यक्रमाला येण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन दिल्याचे त्यांनी ट्विटर हँडलवर लिहिले आहे.VHP invites LK Advani, MM Joshi to Ram Temple event, says ‘they will try their best’



त्यापूर्वी श्रीराम जन्मभूमी मंदिर ट्रस्टचे सचिव चंपत राय यांनी लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या दोन्ही नेत्यांनी स्वतःच्या वयाचा विचार करून कार्यक्रमाला येण्याची तसदी घेऊ नये, अशी “विनंती” केली होती. मात्र, त्यामुळे संघ परिवारात तसेच बाहेरही वेगळा “मेसेज” गेला. अडवाणी आणि जोशींसारख्या ज्येष्ठ नेत्यांना विश्व हिंदू परिषद आणि राम मंदिर ट्रस्ट राम लल्लांच्या प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला येऊ देत नाही, हा तो “मेसेज” होता.

पण राम मंदिर आंदोलनातले लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशींचे योगदान लक्षात घेता विश्व हिंदू परिषदेच्या आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्षांनी स्वतः त्यांच्या घरी जाऊन 22 जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले.

लालकृष्ण अडवाणी हे अयोध्येतील राम रथयात्रेचे प्रणेते आणि आंदोलनाचे अग्रणी होते. त्याचबरोबर मुरली मनोहर जोशींचे देखील राम मंदिर आंदोलनामध्ये मोठे योगदान होते. अडवाणी आणि जोशी यांच्याच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत राम मंदिर आंदोलन देशव्यापी झाले होते. 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीद उध्वस्त होत असताना अडवाणी आणि जोशी हे स्वतः प्रत्यक्ष घटनास्थळी हजर होते.

मात्र सध्या हे दोन्ही नेते वयोमान परत्वे राजकीय निवृत्तीचे जीवन जगत आहेत. लालकृष्ण अडवाणी 96 वर्षांचे आहेत, तर मुरली मनोहर जोशींनी नव्वदी पार केली आहे. परंतु दोन्ही नेते “ऍक्टिव्ह” देखील आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दोन्ही नेत्यांच्या वाढदिवशी त्यांच्या घरी जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा रिवाज ठेवला आहे.

या पार्श्वभूमीवर चंपत राय यांचे व्हायरल झालेले वक्तव्य वेगळा “मेसेज” देऊन गेले. त्यामुळे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष अलोक कुमार यांनी डॅमेज कंट्रोल करत स्वतः लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या घरी जाऊन त्यांना 22 जानेवारीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. या नेत्यांनी आपण कार्यक्रमाला येण्याचा भरपूर प्रयत्न करू असे आश्वासन दिल्याचे ट्विटर हँडलवर लिहिले.

VHP invites LK Advani, MM Joshi to Ram Temple event, says ‘they will try their best’

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात