वृत्तसंस्था
हरिद्वार : कुंभमेळ्यादरम्यान एका खासगी प्रयोगशाळेने केलेल्या चाचण्यांचे बनावट अहवाल दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या आरोपांची चौकशी करण्याचे आदेश उत्तराखंड सरकारने दिले. यावर्षी एक एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत हरिद्वार, डेहराडून, टिहरी आणि पौरी येथे कुंभमेळा पार पडला होता. कोरोनात वाढ झाल्यामुळे कुंभमेळ्यावर जगभरातून टीका झाली होती. Uttarakhnad gpvt. Takes action for false corona test report
पंजाबमधील एका व्यक्तीला कोरोना चाचणीसाठी त्याचे नमुने घेतल्याचा संदेश आला होता. कुंभमेळ्याच्या कालावधीत तो पंजाबमध्येच होता. तरीही त्याच्या नावाने संदेश आल्याने शंका निर्माण झाली. आपले आधार कार्ड आणि मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करण्यात आल्याची तक्रार त्या व्यक्तीने ‘आयसीएमआर’कडे केली होती. आयसीएमआरने त्याची दखल घेत उत्तराखंड सरकारच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली होती. तेव्हापासून कोरोना चाचण्यांचे बनावट अहवाल तयार करण्यात येत असल्याचे आरोप करण्यात येत होते.
उत्तराखंड सरकारने संबंधित खासगी प्रयोगशाळेने कुंभमेळ्यादरम्यान केलेल्या सर्व चाचण्यांची प्राथमिक तपासणी केली. त्यात अनेक बनावट अहवाल आढळल्यानंतर या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश सरकारने आता दिले आहेत. कुंभमेळ्यादरम्यानच ‘रॅपिड अँटिजेन’ चाचण्या करण्याची जबाबदारी या प्रयोगशाळेवर सोपविण्यात आली होती.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App