मुसळधार पावसाचे रुपांतर आपत्तीत झाले
विशेष प्रतिनिधी
रुद्रप्रयाग : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील गौरीकुंडमध्ये भूस्खलनामुळे १९ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी चार मृतदेह ढिगाऱ्या खालून बाहेर काढण्यात आले. तर बेपत्ता १५ जणांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. Uttarakhand Landslide Four bodies found under landslide debris in Gaurikund search for 15 missing continues
रात्री उशिरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचे रुपांतर आपत्तीत झाले आहे. पावसामुळे दरड कोसळल्याची माहिती रात्री उशिरा मिळाली, त्यानंतर एसडीआरएफसह जिल्हा प्रशासनाचे पथक बचावकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले, मात्र रात्री बचावकार्यात अडचणी आल्याने ऑपरेशन थांबवावे लागले होते.
यानंतर सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले, मात्र संततधार पाऊस हे आव्हान कायम आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नंदन सिंह राजवार यांनी सांगितले की, पोलिसांमार्फत मिळालेल्या माहितीनुसार, केदारनाथ यात्रा मार्गावरील गौरीकुंड दातपुलियाजवळ झालेल्या अतिवृष्टीमुळे १३ लोक (तीन स्थानिक, सात नेपाळी आणि तीन अन्य राज्यातील) याशिवाय बेपत्ता झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App