विशेष प्रतिनिधी
लखनऊ:उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचे निकाल आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहेत. भारतीय जनता पक्षाने (भाजप) अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचा (एसपी) सरळ लढतीत पराभव केला. भारतीय जनता पक्ष 269 जागांवर विजय मिळवून सरकार स्थापन करणार आहे, तर समाजवादी पक्ष 135 जागांवर घसरला आहे. भाजपच्या या विजयावर मुलायमसिंह यादव यांच्या सूनबाई अपर्णा यादव भावूक झाल्या आहेत त्यांनी याबद्दल एक ट्विट करत आपला आनंद व्यक्त केला आहे.Uttar Pradesh results: Aayega Phirse Ramrajya – Aparna Yadav overwhelmed by BJP’s victory! Find out what Mulayam Singh’s younger daughter-in-law said …
बाबा को सजने जा रहा है फिर से ताज Iआएगा राम राज्य जय श्री राम 🙏🏻@narendramodi @myogiadityanath @BJP4India @BJP4UP #BJPWinningUP — Aparna Bisht Yadav (@aparnabisht7) March 10, 2022
बाबा को सजने जा रहा है फिर से ताज Iआएगा राम राज्य जय श्री राम 🙏🏻@narendramodi @myogiadityanath @BJP4India @BJP4UP #BJPWinningUP
— Aparna Bisht Yadav (@aparnabisht7) March 10, 2022
अपर्णा यादव यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आनंद व्यक्त करत रामराज्य आले असा संदेश दिला आहे.. अपर्णा यादव यांनी ट्विट केले की, ‘ताज पुन्हा बाबांची शोभा वाढवणार आहे. आएगा राम राज्य जय श्री राम.” निवडणुकीदरम्यान अपर्णा यादव सपा सोडून भाजपमध्ये दाखल झाल्या. अपर्णा सपामध्ये असल्यापासून सीएम योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फॅन आहेत.
भाजपने अपर्णा यादव यांना एकाही जागेवरून तिकीट दिलेले नाही. त्यांच्याकडे प्रचाराची जबाबदारी देण्यात आली होती. अपर्णा यादव यांनी यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये डझनभर सभा घेतल्या आणि त्या पक्षाच्या प्रचारात व्यस्त होत्या. अपर्णा यादव यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे भाऊ असे वर्णन केले आहे. अपर्णा यांचा भाजपमध्ये प्रवेश अखिलेश यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App