Keshav Prasad Maurya : यूपीचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांचा आघाडी पिछाडीचा खेळ ! सर्वांचीच धाकधूक वाढली…


संपूर्ण राज्याच्या नजरा कौशांबीच्या सर्वात हॉट सीट सिरथूकडे लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य येथून निवडणूक रिंगणात आहेत. बसपाने येथून मुनसाब अली उस्मानी यांना उमेदवारी दिली आहे. समाजवादी पार्टी (एसपी) आघाडीने येथून पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे.


विशेष प्रतिनिधी

सिराथू : उत्तर प्रदेश निवडणुकीत सिरथू विधानसभा जागा ही सर्वाधिक चर्चेत असलेली जागा आहे. येथून भाजपच्या तिकीटावर राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य रिंगणात आहेत. समाजवादी पार्टी (एसपी) आघाडीने येथून पल्लवी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. या सामन्यात दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची स्पर्धा आहे.Keshav Prasad Maurya: UP Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya’s lead is a backward game! Everyone’s panic increased …

आजच्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये दिग्गजांना पराभवाचं तोंड पाहावं लागलंय. पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदरसिंग, मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी, नवज्योत सिंग सिद्धू यांना पराभवाला तोंड द्यावं लागलंय. दुसरीकडे उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा असलेले हरीश रावत यांचा देखील पराभव झाला. उत्तराखंडमध्ये भाजपचे मुख्यमंत्री पुष्कर धामी यांचा पराभव झाला आहे. तर, गोव्यातील दोन उपमुख्यमंत्र्यांचा पराभव झाला आहे. तर, उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य (Keshav Prasad Maruya) यांना काही वेळ आघाडी मिळतेय तर ते पुन्हा पिछाडीवर जात आहेत. सिराथू मतदारसंघातून सपाच्या पल्लवी पटेल (Pallavi Patel) यांनी केशवप्रसाद मौर्य यांच्यावर आघाडी मिळवलीय. त्यामुळं उत्तर प्रदेशमध्ये ही गोव्याची पुनरावृत्ती होणार का हे पाहावं लागेल.

काय आहेत आकडे

सिरथूमध्ये सपा आघाडीच्या उमेदवार पल्लवी पटेल यांना आतापर्यंत 80 हजार 532 मते मिळाली आहेत. तर केशव प्रसाद मौर्य यांना 78 हजार 257 मते मिळाली. 24 व्या फेरीपर्यंत केशव मौर्य 2 हजार मतांनी पिछाडीवर आहेत.

 

गोव्यात उपमुख्यमंत्र्यांचा पराभव

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर हे काँग्रेस सोडून भाजपात आले होते. त्यांना प्रमोद सावंत सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यांच्या पराभवानं भाजपला मोठा धक्का बसला आहे. तर, गोव्याचे दुसरे उपमुख्यमंत्री मडगाव मतदारसंघातून बाबू उर्फ मनोहर आजगावकरही चारी मुंड्या चित झाले आहेत. विशेष म्हणजे दोघंही उपमुख्यमंत्री पक्षांतर करुन भाजपात आले होते.

 

Keshav Prasad Maurya: UP Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya’s lead is a backward game! Everyone’s panic increased …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात