उत्तरप्रदेश सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य, औद्योगिकीकरण आणि प्रगतीतही दुसºया क्रमांकावर


विशेष प्रतिनिधी

कोलकाता : उत्तर प्रदेश देशातील सर्वाधिक गुंतवणुकीचे राज्य बनले आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक गुंतवणूक होत असून, औद्योगिकीकरण आणि आर्थिक प्रगती या दोन्ही क्षेत्रांत दुसऱ्या क्रमांकाचे राज्य असल्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.Uttar Pradesh is the most invested state, in terms of industrialization and progress second

भारतीय वाणिज्य मंडळाच्या (इंडियन चेम्बर्स ऑफ कॉमर्स) वार्षिक सत्रात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, उत्तरप्रदेश हे देशात सर्वाधिक गुंतवणूक होत असलेल्या राज्यांपैकी एक आहे. याठिकाणी गुंतवणूक करणाºया उद्योगांना विविध प्रकारच्या सरकारी सुविधांसह सुरक्षासंबंधी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही.



हा मोठा बदल मागील पाच वर्षांच्या काळात प्रत्यक्षात दिसून येत आहे. उत्कृष्ट कायदा आणि सुव्यवस्था, चांगल्या सुधारणा आदींमुळे उत्तरप्रदेशातील औद्योगिकीकरण वाढत असून, आर्थिक क्षेत्रात मोठी प्रगती होत आहे. 2015-16 या काळात उत्तरप्रदेश हे आर्थिक सुधारणांच्या मानांकनात भारतात सहाव्या स्थानावर होते.

परंतु, मागील पाच वर्षांत हे स्थान दुसºया किंवा तिसºया स्थानांवर आले आहे.केंद्र सरकारच्या विविध योजना राबवण्यात उत्तरप्रदेश 25 व्या किंवा 30 व्या स्थानावर असणारे उत्तर प्रदेश आता किमान 44 योजनांची अंमलबजावणी करण्यात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले असल्याचे सांगून योगी आदित्यनाथ म्हणाले,

काही दिवसांपूर्वी राज्यात केवळ दोन द्रूतगती मार्ग (एक्स्प्रेस हायवेज) होते. आता पाच नवे मार्ग बांधण्यात आले आहेत. लवकरच राज्यात पाचवे आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्णत्वास येणार असून, या श्रेणीत देशात पहिल्या क्रमांकावर असेल. आपल्या सरकारने सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील निर्यात क्षेत्रात नवे धोरण तयार केले असून, राज्याने यात 1.31 लाख कोटींची निर्यात केली आहे. यात आम्हाला सहावे स्थान मिळाले आहे.

Uttar Pradesh is the most invested state, in terms of industrialization and progress second

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात