विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतात कोरोना आटोक्यात येत असल्याचे वातावरण तयार झाले होते. परंतु या विषाणूच्या एका नवीन प्रकाराने जगात प्रवेश केला आहे. ओमिक्रोन व्हेरीएंट या नावाचा कोरोनाच्या नवीन विषाणूचा प्रसार जगभरात होत असल्याने परत वातावरण बिघडले आहे. केंद्र सरकारने याची दखल घेऊन राज्यांना प्रतिबंधक सूचना दिल्या आहेत. परंतु राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर या नवीन विषाणूबाबत टिका केली आहे.
Rahul Gandhi criticizes PM Modi over Corona
कोरोना लसीकरणाचे अपयश एका व्यक्तीचे फोटो लावून दिर्घकाळ लपवता येणार नाही अशी टीका पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की भारतातील जनतेला या विषाणूच्या प्रसाराचा धोका आहे. राहुल गांधी यांनी एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की, “कोरोनाच्या नवीन विषाणूमुळे देशातील नागरिकांना धोका आहे. केंद्र सरकारकडून आता अधिक गंभीरपणे नागरिकांना लस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कोरोना लसीकरणाची देशातील स्थिती वाईट असून ती एका व्यक्तीच्या फोटो मागे दिर्घकाळ लपवता येणार नाही.”
Rahul Gandhi Tweet Viral: ‘लिहून घ्या माझे शब्द, सरकारला शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावे लागतील’, राहुल गांधींचे 10 महिने जुने ट्विट व्हायरल
राहुल गांधी म्हणाले की मागील आठवड्यात रोज फक्त ६८ लाख लोकांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाची गती संथ आहे. रोज अडीच कोटी लोकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे असेही ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more