वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : अमेरिका युक्रेनच्या निर्वासितांना घेईल का, असा प्रश्न अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांना हसू आवरले नाही. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. US Vice President Kamala Harris laughed out loud at the question of Ukraine refugees; Criticism on social media
पोलंडचे नेते डाडू आणि कमला हॅरिस यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना युक्रेनच्या शरणार्थीना अमेरिका घेईल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेता. त्या जोरात हसल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचीझोड उठली आहे. युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा काढण्याऐवजी त्या शरणार्थींची टिंगल उडवत असल्याचा आरोप होत आहे. युक्रेन रशिया युद्धाचा मोठा त्रास पोलंड, हंगेरी, रुमानिया या देशाना होत आहे. लाखोंच्या संख्येने निर्वासित या देशाकडे जात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App