यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाईसंबंधी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या चर्चेत विधानसभा सदस्य सुभाष देशमुख,मदन येरावार, प्रकाश सोळंके यांनी भाग घेतला. Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assemblyबाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ ही बँक नोंदणीकृत सहकारी बँक असून या बँकेत ५३६.३१ कोटी रूपयांच्या ठेवी असून बँकेमार्फत ३३६.५२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकेचा संचित तोटा १०८.६० कोटी रुपयेइतका आहे. या बँकेत बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आल्याबद्दल याची चौकशी सुरू आहे.

अनियमित कर्ज वाटप, कर्ज वसुलीसाठी ठोस कारवाई न करणे, चुकीच्या पद्धतीने ओ.टी.एस.योजना राबविणे आदी मुद्दयांचा त्यामध्ये समावेश आहे या चौकशी समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था