विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : युक्रेनमधील रशियन हल्ल्याचा गुरुवारी ५० वा दिवस होता. ऑस्ट्रेलियाने गुरुवारी जाहीर केले की त्यांनी मॉस्कोसाठी आर्थिक आणि धोरणात्मक महत्त्व असलेल्या १४ रशियन मालकीच्या कंपन्यांवर आर्थिक निर्बंध लादले आहेत. US provides Rs 6,000 crore aid to Ukraine
ऑस्ट्रेलियन परराष्ट्र मंत्री मॉरिस पेने म्हणाले की रशियन संरक्षण क्षेत्राशी निगडीत कंपन्यांवरील निर्बंधांमध्ये शिपिंग कंपन्या सेवामॅश आणि युनायटेड शिपबिल्डिंग, तसेच रशियाच्या ८० टक्के इलेक्ट्रॉनिक घटकांच्या निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या रुइलेक्ट्रॉनिक्सचा समावेश आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाकडून पूर्व युक्रेनमध्ये नव्याने हल्ला होण्याची भीती असताना रशियाला ८०० दशलक्ष डॉलर (६, ००० कोटी रुपये) नवीन लष्करी मदत मंजूर केली आहे. या मदतीमध्ये अतिरिक्त हेलिकॉप्टर आणि अमेरिकन तोफखान्यांचा समावेश आहे. नवीन मदतीमध्ये चिलखती वाहने, नौदलाद्वारे किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येणारी ड्रोन जहाजे, रासायनिक, जैविक, आण्विक युद्ध आणि किरणोत्सर्गाच्या परिस्थितीत सैनिकांचे संरक्षण करण्यासाठी कपडे यांचा समावेश आहे. युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्याशी बायडेन यांच्या चर्चेनंतर नवीन लष्करी मदतीची घोषणा करण्यात आली.
रशियन युद्धनौका ‘मोस्क्वा’ नष्ट
काळ्या समुद्राच्या प्रदेशातून युक्रेनवर क्षेपणास्त्रांचा वर्षाव करणारी रशियाची सर्वात महत्त्वाची युद्धनौका ‘मोस्क्वा’ नष्ट झाली. ओडेसाचे गव्हर्नर मॅक्सिम मार्चेन्को यांनी पुष्टी केली की युक्रेन युद्धाच्या ५० व्या दिवशी ब्लॅक-सी संरक्षण चेपचुन क्षेपणास्त्रांनी रशियन जहाजाचे गंभीर नुकसान केले आहे. रशियन संरक्षण मंत्रालयाने देखील युद्धनौकेचे नुकसान झाल्याची पुष्टी केली असून सर्व क्रू सदस्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.
ही युद्धनौका नष्ट होणे हा रशियासाठी मोठा धक्का आहे. युक्रेनियन राष्ट्राध्यक्षांचे सल्लागार ओलेक्सी एरेस्टोविच म्हणाले की, मोस्क्वा’चा विध्वंस आश्चर्यकारक होता. आम्हाला समजत नाही काय झाले? सध्या ती आगीच्या भक्ष्यस्थानी आहे. दुसरीकडे, रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, ‘मोस्क्वा’ नावाच्या युद्धनौकेला (क्षेपणास्त्र क्रूझर) आग आणि दारूगोळ्याच्या स्फोटाचा फटका बसला आहे.
१२,५०० टन वजनाची गाईडेड मिसाईल क्रूझर
रशियाची मॉस्कवा युद्धनौका ही ६०० फूट लांबीची आणि १२,५०० टन वजनाची गाईडेड मिसाईल क्रूझर आहे. ती प्रथम १९७९ मध्ये लॉन्च केली गेली होती आणि ती खूप वेगाने जळत आहे. समुद्रातील वादळी हवामानामुळे मदत मिळेल की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. या युद्धनौकेत ५१० क्रू मेंबर्स होते, ज्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याचा दावा केला जात आहे. ही युद्धनौका १६ अँटी-शिप वल्कन क्रूझ क्षेपणास्त्रांनी सुसज्ज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more