अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अमेरिकेने भारताला ‘हार्पून ज्वाइंट कॉमन टेस्ट सेट’ (जेसीटीएस) आणि त्याच्याशी संबंधित उपकरणं विक्री करण्यास मंजुरी दिलीय. हा व्यवहार 8 कोटी 20 लाख डॉलरचा असेल. US Approves Harpoon Missile Deal With India Worth USD 82 Million 20 hours ago
अमेरिकेने म्हटलं आहे, “‘डिफेंस सिक्युरिटी कोऑपरेशन एजन्सी’ने सोमवारी (2 ऑगस्ट) या संबंधी अमेरिकेच्या संसदेला अधिसूचित करण्यात आलंय. हार्पून एक जहाज विरोधी क्षेपणास्त्र आहे. भारताने एक जेसीटीएस खरेदी करण्याबाबत विचारणा केली होती. यात एक ‘हार्पून इंटरमीडिएट लेव्हल’ देखरेख स्टेशन, सुटे भाग आणि दुरुस्ती, परीक्षण संबंधी उपकरण, प्रक्षेपण आणि तांत्रिक दस्तावेजीकरण, कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण, अमेरिका सरकार आणि ठेकेदाराकडून तांत्रिक , इंजीनियरिंग आणि इतर मदत सेवा या मुद्द्यांचा समावेश आहे.
हिंद-प्रशांत महासागरात भारताची ताकद वाढणार, शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची भूमिका या क्षेपणास्त्राची अंदाजे किंमत 8 कोटी 20 लाख डॉलर आहे. डीएससीएने म्हटलं, “या प्रस्तावित विक्रीमुळे भारतीय-अमेरिकेतील संबंधांत सुधारणा होईल. तसेच एका मोठ्या संरक्षण भागीदाराची सुरक्षा वाढवण्यात मदत करुन अमेरिका आपली परदेश नीती आणि राष्ट्रीय सुरक्षा अधिक बळकट करेल (Harpoon Missile US). भारत हिंद-प्रशांत आणि दक्षिण आशिया क्षेत्रात राजनैतिक स्थिरता, शांतता आणि आर्थिक विकासासाठी महत्त्वाची शक्ती आहे.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App