प्रतिनिधी
नवी दिल्ली : यूपीएससी कंबाईन्ड डिफेन्स सर्व्हिसेस (सीडीएस- II) 2021 परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी आणि अंतिम निकाल upsc.gov.in वर ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आला आहे. संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेत बसलेले विद्यार्थी युपीएससीच्या अधिकृत साईट upsc.gov.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात. निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत उमेदवारांचे गुण उपलब्ध करून दिले जातील असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. UPSC CDS 2 Final Result
इंडियन मिलिटरी अकादमी, ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमी, इंडियन नेव्हल अकादमी आणि इंडियन एअर फोर्स अकादमीमध्ये कमिशन्ड ऑफिसर्सच्या भरतीसाठी युनियन लोकसेवा आयोगाद्वारे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा घेतली जाते. एकूण 214 निकालांच्या आधारे उमेदवारांची अखेर निवड करण्यात आली आहे. अधिक संबंधित तपशील जाणून घेण्यासाठी उमेदवार यूपीएससीच्या अधिकृत साइटला भेट देऊ शकतात.
शिफारस केलेल्या आणि निवडलेल्या उमेदवारांचे गुण हे निकाल जाहीर झाल्यापासून 15 दिवसांच्या आत म्हणजेच 26 ऑगस्ट 2022 रोजी उपलब्ध करून दिले जातील. एकदा रिलीझ झाल्यानंतर, उमेदवार 26 ऑगस्ट 2022 पासून युपीएससी सीडीएस II 2021 परीक्षेसाठी त्यांचे गुणपत्रक डाउनलोड करू शकणार आहेत.
असा पाहता येणार निकाल
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App