UP religion Conversion Case : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराचा भयंकर कट उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्या अतिशय धोकादायक कट समोर आला आहेत. नोएडा सेक्टर -117 मध्ये असलेल्या डेफ सोसायटीमध्ये शिकणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांना मानवी बॉम्बचे बनवून भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण करण्याचा कट आरोपींनी रचला होता. UP religion Conversion Case, accused want to use deaf students as human bombs media reports
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतराचा भयंकर कट उघडकीस आणला आहे. याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. चौकशीत त्यांच्या अतिशय धोकादायक कट समोर आला आहेत. नोएडा सेक्टर -117 मध्ये असलेल्या डेफ सोसायटीमध्ये शिकणाऱ्या मूकबधिर विद्यार्थ्यांना मानवी बॉम्बचे बनवून भारतासह संपूर्ण जगात दहशत निर्माण करण्याचा कट आरोपींनी रचला होता.
नोएडामध्ये असलेल्या डेफ सोसायटीत शिकत असलेले विद्यार्थी बोलू आणि ऐकू शकत नाहीत. मग एकदा धर्मांतर झाल्यावर विद्यार्थ्यांची दिशाभूल करणे सोपे होते. या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून दहशतवादी घटना घडवून आणण्याचा कट रचला जात होता. धर्म परिवर्तनासाठी परदेशातून प्रचंड निधी उपलब्ध होत होता. प्रामुख्याने हा निधी पाकिस्तान आणि अरब देशांकडून येत असल्याचे समोर आले आहे. या षडयंत्रांतर्गत विपुल विजयवर्गीय आणि कासिफ यांना गाझियाबादमधील दासना देवी मंदिरात पाठविण्यात आले. चौकशीत देशातील अनेक मूलगामी संघटनांशी त्यांचा संबंध उघडकीस आला आहे. एजन्सी त्यांच्या नेटवर्कच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
नोएडाच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, गँगमध्ये सामील असलेले लोक मूकबधिर विद्यार्थ्यांना आणि महिलांना टारगेट करायचे, हे तपासात आतापर्यंत समोर आले आहे. विशेषत: चॅरिटेबल ट्रस्ट-संचालित संस्थेच्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केल जात होते. धर्मादाय संस्थेमार्फत मिळालेल्या पैशातून नोएडा डेफ सोसायटीही चालविली जात होती. अशी भीती व्यक्त केली जात आहे की आरोपींनी नोएडा डेफ सोसायटीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे धर्मांतर करण्याचा कट रचला होता.
मूकबधिर विद्यार्थ्यांना लक्ष्य केले गेले, कारण असे लोक ऐकू किंवा बोलू शकत नाहीत. एकदा विद्यार्थी या जाळ्यात अडकले, त्यांच्या मूळ धर्माप्रति द्वेष निर्माण करून आणि त्यांचा इस्लाम धर्मावर विश्वास वाढवला जातो. यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या मूळ धर्माचा द्वेष करायला सुरुवात केली. अशी भीती व्यक्त केली जात आहे की, आरोपी विद्यार्थ्यांमार्फत देशात दहशतवादी घटना घडविण्याचा प्रयत्न करत होते. विद्यार्थ्यांना मानवी बॉम्ब म्हणून वापरून हादरविण्याचा कट होता.
देशभरात सुरू असलेल्या धर्मांतराच्या कटाबाबत सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीत महत्त्वपूर्ण माहिती समोर आली आहे. धर्म परिवर्तनासाठी परदेशातून प्रचंड निधी उपलब्ध होत आहे. प्रामुख्याने हा निधी पाकिस्तान आणि आबर देशांकडून येत आहे. यानंतर सुरक्षा यंत्रणांनी देशभरातील संशयितांच्या बँक खात्यांचा शोध सुरू केला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रडारवर 100 हून अधिक बँक खाती ठेवण्यात आली आहेत. यापैकी सुमारे तीन डझन खाती शोधली गेली आहेत. ही गोपनीय चौकशी असल्याने याची माहिती सार्वजनिक केली जात नाही.
परकीय निधीबरोबरच अनेक दहशतवादी संघटनांकडूनही वित्तपुरवठा केला जात आहे. परिवर्तनासाठी मूलगामी संस्थांना प्रचंड प्रमाणात पैसे पाठवले जात आहे. त्याच वेळी, या कटात अनेक व्हाइट कॉलर लोकांचा सहभाग असण्याची शक्यता आहे. हे लोक पडद्यामागील कट्टरपंथी संस्था आणि धर्मांतरण टोळ्यांना समर्थन देत आहेत. संस्थेने देशाच्या विविध भागांत पाय रोवले आहेत. विपुल विजयवर्गीय आणि कासिफ यांना दासना देवी मंदिरात पाठविण्यात आले होते. चौकशीत विपुल, कासिफ आणि सलीमुद्दीन यांचे देशातील अनेक मूलतत्त्ववादी संघटनांचे दुवे उघडकीस आले आहेत. एजन्सी त्यांच्या नेटवर्कच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न करत आहेत.
UP religion Conversion Case, accused want to use deaf students as human bombs media reports
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App