विशेष प्रतिनिधी
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या काँग्रेस आमदार अदिती सिंहने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अदिती सिंह रायबरेली जिल्ह्यातील गढ मतदारसंघाच्या आमदार आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.दोन्ही नेत्यांच्या भाजप प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र सिंह म्हणाले, दोन लोकप्रिय नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. UP Election 2022: Congress MLAs Aditi Singh and Vandana Singh join BJP!
आदिती सिंह या 2017 साली कॉंग्रेसच्या तिकिटावर यूपी विधानसभा निवडणूक लढवली होती, रायबरेली मतदार संघातून त्या निवडुण आल्या होत्या. गेल्या दीड वर्षांपासून काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणावर सातत्याने टीका करत होत्या.
अनेक जाहीर कार्यक्रमात त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर देखील टीका केली. आदिती सिंह 2017 साली विधानसभा निवडणुकीत एक लाखाच्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. भाजपचे उत्तर प्रदेश प्रदेशाध्यक्ष स्वतंत्र देव सिंह यांच्या उपस्थितीत अखेर भाजप प्रवेश केला. आदिती सिंह यांचे पती अजूनही काँग्रेसमध्येच आहेत त्यांना आता पंजाब मध्ये तिकीट मिळतं का याचीही उत्सुकता आहे.
तर वंदना सिंह यांनी आजमगढची जागा बसपाच्या तिकिटावर जिंकली होती. वंदना सिंह यांनी समाजवादी पक्षाच्या जयराम पाटील यांचा पराभव केला होता. वंदना सिंह यांचे पती सर्वेश सिंह उर्फ सिपू यांनी 2007 साली समाजवादीच्या तिकिटाव निवडणूक लढवली होती. बसपाचे मलिक मसूद यांचा पराभव करत ते आमदार म्हणून निवडून आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App