United Nations : बांगलादेशातील आंदोलकांच्या हत्येची संयुक्त राष्ट्र चौकशी करणार!

United Nations

संयुक्त राष्ट्र संघाचे एक पथक लवकरच बांगलादेशला भेट देणार आहे


विशेष प्रतिनिधी

ढाका : मागील आठवड्यात शेख हसीना यांच्या राजीनाम्यापूर्वी आणि नंतर झालेल्या निदर्शकांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाचे ( United Nations ) एक पथक लवकरच बांगलादेशला भेट देणार आहे. बुधवारी ही घोषणा करण्यात आली.

बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी ट्विटरवर लिहिले की, ‘यूएन मानवाधिकार प्रमुख वोल्कर तुर्क यांनी बुधवारी बांगलादेशचे मुख्य सल्लागार प्रोफेसर मोहम्मद युनूस यांच्याशी फोनवर चर्चा केली.’ व्होल्करने युनूस यांना फोनवर सांगितले की, “संयुक्त राष्ट्रांचे पथक (हत्यांचा) तपास करण्यासाठी देशाला भेट देईल.



गेल्या आठवड्यात पंतप्रधान हसीना राजीनामा देऊन भारतात गेल्यानंतर बांगलादेशात अराजक माजले होते, त्यानंतर लष्कराने 5 ऑगस्टला सत्ता हाती घेतली होती. याआधी सरकारविरोधी आंदोलनात 500 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

8 ऑगस्ट रोजी मुख्य सल्लागार म्हणून शपथ घेतलेल्या युनूस यांनी ट्विटरवर एका पोस्टमध्ये म्हटले आहे की यूएन मानवाधिकार प्रमुख म्हणाले की, विद्यार्थी क्रांतीदरम्यान आंदोलकांच्या हत्येची चौकशी करण्यासाठी लवकरच यूएनच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू केली जाईल.

United Nations will investigate in Bangladesh

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात