रामनवमीला बिहार, पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या हिंसाचारावर केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतापले, म्हणाले…

Giriraj Singh

ताजियावर कोणी गोळीबार, बॉम्बस्फोट आणि दगडफेक केली का? असा प्रश्नही विचारला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : रामनवमीच्या दिवशी देशभरात अनेक ठिकाणी जाळपोळ, दगडफेक आणि गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत.   रामनवमीला झालेल्या हिंसाचारामुळे केंद्रीयमंत्री गिरीराज सिंह संतप्त झाले आहेत. “जर भारतात रामनवमीला मिरवणूक काढता येत नसेल, तर कुठे काढणार? तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे बिहार असो किंवा बंगाल, हिंदूंना दुय्यम दर्जाचे नागरिक बनवले गेले आहे. हे दुःख नाही, सत्य आहे.” असं त्यांनी म्हटलं आहे. Union Minister Giriraj Singh expressed anger over violence in Bihar and West Bengal during Ram Navami

पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या की, सर्वांनी आनंदाने मिरवणूक काढा, पण रमजानचा महिना सुरू आहे हे लक्षात ठेवा, त्यामुळे मुस्लीम वस्त्यांमधून जाणे टाळा. यावर गिरीराज सिंह म्हणाले, “सद्भावना कोण बिघडवतंय? तुम्हीच बघा बंगालमध्ये त्या म्हणतात की मुस्लिमांचा रमजान आहे. त्यांना रामनवमीची, हिंदूंची चिंता कुठे आहे? सासाराममध्ये हिंदूंवर हल्ले झाले. मी दोन्ही राज्यांच्या सरकारांना विचारतोय. मी मुस्लिमांना विचारतोय. मला प्रश्न पडतो की स्वातंत्र्यानंतर ताजियावर कोणी गोळीबार, बॉम्बस्फोट आणि दगडफेक केली का? मग माझ्या रामनवमीच्या मिरवणुकीवरच दगडफेक का?”


आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांचा केजरीवालांवर जोरदार पलटवार म्हणाले…


केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह पुढे म्हणाले, “हिंदू आणि मुस्लिमांच्या आधारावर या देशाची फाळणी झाली. हे वातावरण कोण बिघडवत आहे? आम्हाला बिघडवायचे असते तर आमच्या मुलांनी ताजियावर दगडफेक केली असती. पण हे आमच्या डीएनए मध्ये नाही. ही देशाच्या चिंतेची बाब आहे, कारण काही जण ‘’आम्ही हसत हसत पाकिस्तान घेतला आणि लढून भारत मिळवू.’’ अशा घोषणाही काही लोक देतात.

याशिवाय, बिहारमधील सुरक्षा आणि कायदा सुव्यवस्थेबाबत गिरीराज सिंह यांनी नितीश कुमार सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, ‘’पीएफआयचे मुख्यालय पाटणा येथे चालत असे. लालूंच्या राजवटीत सिमीचे मुख्यालय काही किलोमीटर अंतरावर होते आणि सरकारला त्याची माहिती नव्हती. एनआयएने येऊन तपास केला असता ते समोर आले.’’

Union Minister Giriraj Singh expressed anger over violence in Bihar and West Bengal during Ram Navami

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात