“ज्यांच्यामुळे इतकी वर्षे मुख्यमंत्री राहिलात, त्यांचा…” बिहारमध्ये अमित शाहांचा नितीश कुमारांवर निशाणा!

विरोधकांची नुकती पाटणामध्ये बैठक पार पडली, यानंतर आता भाजपाही आक्रमक होताना दिसत आहे.

विशेष प्रतिनिधी

बेगुसराय : बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी पक्षांच्या सर्वसाधारण सभेनंतर आता भाजपानेही हालचाली तीव्र केल्या आहेत. गुरुवारी गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेगुसराय येथे एका जाहीर सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर विशेषत: नितीशकुमार यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, ‘’आत्ताच पल्टू बाबू नितीश कुमार विचारत आहेत की, केंद्र सरकारने 9 वर्षात काय केले? नितीशबाबू, ज्यांच्यासोबत इतके वर्षे राहिलात, ज्यांच्यामुळे मुख्यमंत्री झालात,  त्यांचा थोडा आदर करा.’’ Union Home Minister Amit Shah criticizes Chief Minister Nitish Kumar in Bihar

अमित शाह म्हणाले की मोदींनी या 9 वर्षात खूप काम केले आहे. मोदींचे 9 वर्षे गरीब कल्याणाची, भारताचा गौरव, भारताची सुरक्षा यांची आहेत. ते म्हणाले की, याआधी जेव्हा पाकप्रणित दहशतवाद्यांचे हल्ले झाले, तेव्हा सोनिया-मनमोहन यांच्या सरकारने उत्तर दिले नाही, दिल्लीत मौनी बाबा बनून बसायचे, पण पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात जेव्हा पुलवामा आणि उरी येथे हल्ले झाले, तेव्हा मोदींनी दहा दिवसांतच सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून पाकिस्तानच्या घरात घुसून दहशतवाद्यांना ठार केले.

केंद्रीय गृहमंत्री म्हणाले की, काँग्रेस, जेडीयू, आरजेडी, ममता या सर्वांनी कलम 370ला लहान मुलाप्रमाणे स्वत: खेळवत राहिले. ते म्हणत होते कलम 370 हटवलं तर काश्मीरमध्ये रक्ताच्या नद्या वाहतील,  राहुलबाबा रक्ताच्या नद्या दूरच एक दगडही फेकण्याची हिंमत  कोणी केली नाही.

Union Home Minister Amit Shah criticizes Chief Minister Nitish Kumar in Bihar

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात