प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे किंग मेकर नव्हे, किंग ब्रेकर आहेत. कारण सरकारे बनवण्यापेक्षा सरकारे तोडण्यात ते जास्त माहीर आहेत, असा जबरदस्त प्रहार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत केला. इतकेच नाही तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे लोक स्वतःला साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक यांचे मसीहा समजत होते. पण प्रत्यक्षात केंद्रातील मोदी सरकारने साखर कारखानदारी आणि ऊस उत्पादकांसाठी जेवढे निर्णय घेतले, तेवढे आत्तापर्यंतच्या कुठल्याही सरकारांनी घेतले नव्हते, असे परखड वक्तव्य फडणवीस यांनी या मुलाखतीत केले. Sharad Pawar is not a king maker but a king breaker
देवेंद्र फडणवीस सध्या शरद पवारांची प्रतिमा पूर्णपणे भंग करण्याच्या मूडमध्ये आहेत. शरद पवार यांच्या भोवती महाराष्ट्रात ते चाणक्य असल्याचे वलय आहे. ते त्यांच्याभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरवतात, असे दाखवत राहतात. या संदर्भात दूरदर्शनच्या अँकरने सवाल विचारल्यानंतर फडणवीस म्हणाले, की शरद पवार हे किंग मेकर पेक्षा किंग ब्रेकर जास्त आहेत. कारण सरकारे तयार करण्यापेक्षा सरकारे मोडण्यात त्यांचा अनुभव जास्त मोठा आहे. 2019 मध्ये देखील भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या सरकार संदर्भात खुद्द शरद पवार यांच्याशी चर्चा झाली होती. पण नंतर त्यांनीच माघार घेतली. अजित पवारांना मात्र माघार घेणे योग्य वाटले नाही म्हणून ते आमच्या सोबत आले. पण सुप्रीम कोर्टात त्यांचे समर्थक आमदार अपात्र ठरण्याची शक्यता असल्याने आमचे सरकार गेले, असा स्पष्ट खुलासा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
फडणवीस यांनी पवारांच्या विश्वासघाताची सर्व कहाणीच दूरदर्शनच्या मुलाखतीत उलगडून सांगितली. 1978 मध्ये देखील शरद पवारांनी वसंतदादा पाटलांच्या सरकारमधून बाहेर पडून 40 आमदारांबरोबर नवीन पक्ष स्थापन केला आणि त्यावेळच्या जनसंघाला बरोबर घेऊन सरकार स्थापन केले, याची आठवण फडणवीस यांनी पुन्हा एकदा करून दिली.
शरद पवारांनी फडणवीसांवर “गुगली प्रयोग” केल्याची कबुली पुण्यातल्या पत्रकार परिषदेत दिली. पण त्यावर देखील फडणवीस यांनी पलटवार केला आणि शरद पवारांनी आपली विकेट काढली नाही, तर आपल्याच पुतण्याला क्लीन बोल्ड केले. निदान आपण काही वक्तव्य केल्याने शरद पवार अर्धसत्य तरी बोलले. पुढचे सत्य मी गुगली टाकल्यावर बाहेर येईल आणि अजित पवारही सत्य बाहेर आणतील अशा शब्दांत फडणवीस यांनी पवारांना पुढच्या राजकारणाचा गंभीर इशारा दिला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App