केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट हॅक : रशियन हॅकर्सचा ग्रुप फीनिक्सवर आरोप, भारतीय कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडून तपास

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची वेबसाइट गुरुवारी हॅक करण्यात आली. रशियन हॅकर्सनी ही वेबसाइट हॅक केल्याचे बोलले जात आहे. यानंतर मंत्रालयाने इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमला या प्रकरणाची चौकशी करण्यास सांगितले आहे.Union Health Ministry Website Hack Russian Hackers Accuse Group Phoenix, Indian Computer Emergency Response Team Investigates

क्लाउड एक्सच्या सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी दावा केला आहे की, आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटला रशियन हॅकर्सच्या फीनिक्स ग्रुपने लक्ष्य केले आहे. याद्वारे हॅकर्सनी देशातील सर्व रुग्णालयातील कर्मचारी आणि मुख्य डॉक्टरांचा डेटा हॅक केला आहे.



मंत्रालयाने मागवला सीईआरटी-इनकडून अहवाल

मंत्रालयातील एका सूत्राने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) कडून माहिती मागवण्यात आली आहे. ते याची चौकशी करत असून लवकरच अहवाल सादर करतील.

CERT-In भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. हॅकिंग आणि फिशिंगसारख्या सायबर सुरक्षा धोक्यांना सामोरे जाण्यासाठी ही नोडल एजन्सी आहे, जी भारतीय इंटरनेट डोमेनची सुरक्षा मजबूत करते.

क्लाउडसेकने दिलेल्या वृत्तानुसार, हॅकर्सच्या गटाने म्हटले आहे की “ऑइल प्राइस कॅपवर भारताचा करार आणि रशिया-युक्रेन युद्धावरील G20 निर्बंधांमुळे” हा सायबर हल्ला केला आहे. क्लाउडसेकेने सांगितले की, या वेबसाइटला लक्ष्य करण्यामागील हेतू हा रशियन फेडरेशनवर लादले गेलेले निर्बंध होते.

फीनिक्स 2022 पासून सक्रिय

क्लाउडसेकेने सांगितले की, फीनिक्स जानेवारी 2022 पासून सक्रिय आहे आणि हा गट फिशिंग स्कॅम आणि यूएस, जपान आणि यूकेमधील रुग्णालयांना लक्ष्य करण्यासाठी ओळखला जातो. अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या आरोग्य संस्थेच्या वेबसाइटवर आणि स्पॅनिश परराष्ट्र मंत्रालयाच्या वेबसाइटवर झालेल्या हल्ल्यामागेही याच गटाचा हात आहे.

Union Health Ministry Website Hack Russian Hackers Accuse Group Phoenix, Indian Computer Emergency Response Team Investigates

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात