वृत्तसंस्था
नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत जवळपास १३ हजार ३०० भारतीयांना सरकारने मायदेशी आणले आहे. तसेच जे लोक अजूनही युक्रेनमध्ये अडकले आहेत. अशा लोकांसाठी भारत सरकारने महत्वाचा उपक्रम सुरू केला आहे.Ukraine Indian Students: “Google Forms” to help Indians stranded in Ukraine
गुगल फॉर्म भरा
युक्रेनमध्ये जे भारतीय अडकले आहेत. त्यांनी तातडीने गुगल फॉर्म भरून आपली माहिती भरावी असे निर्देश भारतीय दूतावासाने दिले आहेत. या फॉर्ममध्ये ई-मेल, नाव, पत्ता, युक्रेनमध्ये कोणत्या शहरात अडकून आहेत त्या भागाचे नाव,
त्या स्थळाचा पत्ता, पासपोर्ट क्रमांक, युक्रेनमधील मोबाईल क्रमांक, सोबत असलेल्या भारतीयांची माहिती, अशाप्रकारची सर्व माहिती भरून हा फॉर्म दूतावासाला सबमिट करायचा आहे. यामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांची माहिती उपलब्ध होऊन मदतकार्य करणे सोयीचे होणार आहे अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
ALL INDIAN NATIONALS WHO STILL REMAIN IN UKRAINE ARE REQUESTED TO FILL UP THE DETAILS CONTAINED IN THE ATTACHED GOOGLE FORM ON AN URGENT BASIS .
BE SAFE BE STRONG @OPGANGA@MEAINDIA@PIB_INDIA@DDNEWSLIVE@DDNATIONALHTTPS://T.CO/4BRBUXBVBZ
— INDIA IN UKRAINE (@INDIAINUKRAINE) MARCH 6, 2022
ऑपरेशन गंगा
भारत सरकारने ऑपरेशन गंगा अंतर्गत युक्रेनहून आतापर्यंत सुमारे 13 हजार 300 भारतीय नागरिकांनी परत आणले आहे. तसेच पुढील 24 तासांसाठी 13 विमाने नियोजित असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले. युक्रेनच्या युद्धग्रस्त सुमी शहरात अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिडिओ समोर आल्यानंतर भारत सरकारने या विद्यार्थ्यांना घरांमध्ये सुरक्षित राहण्याचा सल्ला दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App