PM Modi Pune : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे दौर्‍यातला भर राजकारणावर नव्हे; विद्यार्थ्यांशी संवादावरच का ठेवला…??


नाशिक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या रविवारच्या पुणे दौऱ्याचा भर राजकारण नव्हे, तर विद्यार्थ्यांशी संवाद करण्यावरच प्रामुख्याने ठेवलेला दिसला. पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी मेट्रो मधून प्रवास करताना आपल्या बरोबर असलेल्या राजकीय पुढाऱ्यांशी नव्हे, तर फक्त शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तसेच सिंबायोसिच्या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना विशिष्ट थीम वर काम करण्याचे आवाहन केले.Prime Minister Narendra Modi’s visit to Pune is not about politics; Interaction with students

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे नेमके का केले असावे…?? त्यांना राजकारण करायचे नव्हते का…?? पुणे महापालिकेची निवडणूक त्यांच्या डोळ्यासमोर नव्हती का…?? या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींच्या आजच्या पुणे दौऱ्याचे नेमके वैशिष्ट्य काय ठरले…??, याचा बारकाईने विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 100 % राजकारणच केले, हे लक्षात येईल… पण ते पठाडीच्या बाहेर जाऊन…!! त्यांनी थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आपल्या नवमतदारांना फक्त पुण्यातच नव्हे, तर संपूर्ण देशभरात टॅप करण्याचा प्रयत्न केला… जो आपल्या पठाडीबद्ध राजकारण्यांच्या आकलना पलिकडचा ठरला.

वास्तविक पाहता कालच राष्‍ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींच्या पुणे दौऱ्यावर राजकीय टिप्पणी करून घेतली होती. आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने वेगवेगळ्या ठिकाणी का होईना पण मोदींच्या विरोधात आंदोलन करून घेतले होते. एवढेच नाही तर एमआयटी महाविद्यालयाच्या जाहीर सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुद्द पंतप्रधान समोर राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या विरोधात तक्रारही करून घेतली. तरी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही राजकीय वादावर काहीही भाष्य न करता उलट पुणे दौऱ्याचा आपला भर विद्यार्थ्यांशी संवादावर आणि विकास कामांच्या मुद्द्यांवर ठेवला. नेमके हेच ते 100 % राजकारण आहे…!!

एरवी पंतप्रधान मोदी महाराष्ट्राच्या आणि विशेषत: पुणे दौर्‍यात शरद पवारांची दखल तरी घेतात. या वेळेला ती दखलही मोदींनी घेतली नाही. उलट विद्यार्थ्यांशी संवाद करू हा संवाद फक्त पुण्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण देशातल्या विद्यार्थ्यांशी आपण संवाद साधत आहोत, याचे भान पंतप्रधान मोदींनी ठेवले. सिम्बॉयसिस मधले विद्यार्थी तर थेट नवमतदार आहेत आणि ते संपूर्ण देशभर विखुरलेल्या प्रबुद्ध जनांचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. अशा स्थितीत येथे स्थानिक पातळीवरच्या राजकारणावर कोणते भाष्य करण्यात मतलबही नव्हता. तो मोदींनी बरोबर साध्य करून घेतला आहे. मराठी माध्यमांनी मोदींच्या एमआयटी मधल्या भाषणात मोदींनी काँग्रेस-राष्ट्रवादीला टोला हाणल्याच्या बातम्या केल्या आहेत. पण एखाद दुसरे वाक्य वगळता मोदींनी त्याबद्दल कोणते भाष्यही केले नाही. त्याउलट त्यांनी विद्यार्थ्यांची संवाद साधत नवमतदारांना टॅप करण्याचा प्रयत्न केल्याचे केल्याचा मुद्दा मराठी माध्यमांच्या तथाकथित बुद्धिवंत विश्लेषणातून वगळला गेला आहे.

काही दिव्यांग विद्यार्थ्यांना ही मोदींबरोबर पुणे मेट्रोतून प्रवास करण्याची संधी मिळाली. या सर्व विद्यार्थ्यांना मोदींनी त्यांच्या करिअरविषयी आवडीनिवडी विषयी विचारले. कोण कोणते करिअर करू इच्छित आहे?, त्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी काय काय करता येऊ शकेल?, देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या विषयी काय माहिती आहे?, वगैरे प्रश्न पंतप्रधान मोदींनी या विद्यार्थ्यांना विचारले. या विद्यार्थ्यांनी पंतप्रधानांची संवाद साधून आपल्याला खूप आनंद झाल्याचे नंतर अनेक वृत्तवाहिन्यांशी बोलताना सांगितले.

मेट्रोमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधून झाल्यानंतर जरी पंतप्रधानांनी एमआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेत भाषण केले असले, तरी त्यात देखील त्यांनी भर विकास कामांवर ठेवला होता आणि त्यानंतर सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंबायोसिसच्या विद्यार्थ्यांना देखील पुढची 25 वर्षे विशिष्ट थीमवर काम करण्यास सांगितले. यासाठी पंतप्रधानांनी काही थीमदेखील सुचवल्या. यामध्ये ग्लोबल वार्मिंग, जल आणि वायू प्रदूषण त्याचबरोबर भारतातल्या सीमावर्ती गावांचा विकास अशा सारख्या थीमवर प्रत्येक वर्षी सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

सिम्बायोसिस विद्यापीठात शिकणारे 50 हजार विद्यार्थी एका तीनवर विशिष्ट योजनाबद्ध पद्धतीने काम करतील तर ते देशासाठी फार मोठे योगदान ठरेल, असे आत्मविश्वासपूर्ण उद्गार पंतप्रधानांनी काढले. त्याच वेळी मेक इन इंडिया, आत्मनिर्भर भारत या केंद्र सरकारच्या योजनांमध्ये स्वतःहून पुढे येऊन स्टार्टअप सारख्या योजनांमधून उद्योजक बनण्याची प्रेरणा पंतप्रधान मोदींनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. आत्मनिर्भर भारतासाठी सध्या एवढा कोणताही अनुकूल काळ कधीही नव्हता कारण आंतरराष्ट्रीय पातळीवर युक्रेन सारखी संकटे निर्माण होत असताना भारताला आपल्या शक्तीची खऱ्या अर्थाने जाणीव झाली आहे. या शक्तीचा लाभ विद्यार्थ्यांनी पुढे येऊन घेतला पाहिजे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ जेव्हा 75 वर्षे पूर्ण करेल तेव्हा दरवर्षी एका थीम वर काम करणारे विद्यार्थी अशा देशाच्या विकासाच्या 25 थीमवर वर काम करतील तर ते फार मोठे योगदान फक्त सिंबायोसिस साठी ठरणार नसून संपूर्ण देशासाठी ठरेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे आपल्या संपूर्ण दौऱ्याचा भर हा प्रामुख्याने विकास कामांवर आणि कोणत्याही वादावरून भाष्य करतात फक्त विद्यार्थ्यांची संवादांवर ठेवल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

– वैद्यकीय शिक्षण परवडणारे करा; डॉ. मुजुमदार यांचे पंतप्रधान मोदींना साकडे!!

तत्पूर्वी, सिम्बॉयसिस विद्यापीठाचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वैद्यकीय शिक्षण स्वस्त करण्याचे आणि परवडणारे करण्याचे आवाहन केले. कोल्हापूर जिल्ह्यातल्या हरळी बुद्रुक या छोट्या गावातून येऊन मी स्वप्न पाहिले आणि आज सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आचे वटवृक्षात रूपांतर झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा द्रष्टा पंतप्रधान आल्याने माझ्या जीवनाचे सार्थक झाले आहे, असे ते म्हणाले. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांना संबोधून ते म्हणाले, ग्रामीण भागातली आपली लोकप्रियता एवढी आहे की माझ्या हरणी बुद्रुक या छोट्या 2000 वस्तीच्या गावातूनही अनेक जण फक्त आपल्याला बघण्यासाठी येथे आले आहेत…!!

Prime Minister Narendra Modi’s visit to Pune is not about politics; Interaction with students

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात