उदयनिधी स्टॅलिन…., कोण आहे हा तमिळनाडूच्या राजकारणात जन्माला येवू घातलेला नवा तारा

विशेष प्रतिनिधी

चेन्नई – तमिळनाडूच्या राजकारणात या निवडणुकीच्या निमित्ताने एक नवा तारा जन्माला येवू घातला आहे. त्याचे नाव आहे, उदयनिधी. राज्याचे माजी मुख्यमंत्री व लोकप्रिय नेते कलैग्नार उर्फ एम. करुणानिधी यांचे नातू व द्रमुकचे सर्वेसर्वा असेलेले एम. के. स्टॅलीन यांचे पुत्र असलेल्या उदयनिधीने यंदाच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. Udaynidhi attracts Tamil peoples fame and love

उदयनिधी ४३ वर्षांचे आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांत अभिनेत्याची भूमिका केली असून काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. २०१३ मध्ये त्यांना फिल्मफेअरचा पदार्पणातील सर्वोत्तम युवा अभिनेता हा पुरस्कार मिळाला होता. २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या वेळी ते स्टार प्रचारक होते. तेव्हा सुद्धा राजकारणातील प्रवेशाची शक्यता मात्र ते वेळोवेळी फेटाळून लावायचे. त्या निवडणुकीत द्रमुकला घवघवीत यश मिळाल्यानंतर त्यांची युवा शाखेच्या चिटणीसपदी निवड झाली.



 

राज्यातील पहिल्या टप्प्याच्या मतदानापूर्वी अखेरच्या टप्प्यात त्यांनी सनसनाटी विधाने केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्यावर तोफ डागली. मोदी यांनी छळ केल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांचा बळी गेला, असे खळबळजनक वक्तव्य त्यांनी केले. त्यानंतर मात्र काही तासांत स्वराज यांची कन्या बांसुरी आणि जेटली यांची कन्या सोनल या दोघींनी त्याचे खंडन केले.

उदयनिधी यांनी अमित शहा यांचा मुलगा जय यालाही लक्ष्य केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) चिटणीस असलेले पुत्र जय यांच्या नावावर मी माझी सारी संपत्ती जमा केली तर त्यांची असे करण्याची इच्छा असेल का, असा सवाल त्यांनी केला.

उमेदवार म्हणून प्रथमच मतदान केलेल्या उदयनिधी यांनी आपल्या पदार्पणातील मोहिमेची तुलना शाळेतील परिक्षेशी केली. मी आत्ताच शाळेचा पेपर लिहून आलो आहे, असे उद्गार त्यांनी काढले. उदयनिधी चेपॉक-ट्रीप्लीकेन मतदारसंघातून नशीब आजमावत आहेत. पट्टाली मक्कल काचीचे ए. व्ही. ए. कसाली त्यांचे मुख्य प्रतिस्पर्धी आहेत.

Udaynidhi attracts Tamil peoples fame and love


इतर बातम्या वाचा…

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात