U. P. Elections : मोदींची “भव्य काशी दिव्य काशी”ची घोषणा; तर अखिलेशचा “सुबह – ए – बनारस”चा नारा!!

प्रतिनिधी

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांची परीक्षा घेणारी प्रचार यात्रा आज थांबली. तब्बल 7 टप्प्यांमध्ये ही निवडणूक असल्याने दीड महिना प्रचाराची रणधुमाळी सुरु होती.U. P. Elections: Modi’s announcement of “Bhavya Kashi Divya Kashi”; So Akhilesh’s slogan “Subah-e-Banaras

सोमवारी 7 मार्च रोजी मतदानाचा अखेरचा टप्पा होणार आहे. त्यानंतर 10 मार्च रोजी उत्तर प्रदेशसह पंजाब, गोवा, उत्तराखंड आणि मणिपूर या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत.



या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव, राष्ट्रीय लोकदलाचे नेते जयंत चौधरी, काँग्रेसचे वरिष्ठ नेते खासदार राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी या सर्वांनी प्रचाराची जोरदार रणधुमाळी उडवली होती. यामध्ये बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांचा देखील समावेश होता. परंतु, तुलनेत त्यांच्या सभा कमी झाल्या. काशी, जोनपुर वगैरे परिसरात या सर्व नेत्यांनी अखेरच्या टप्प्यात जोरदार प्रचार केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भव्य अशी दिव्य काशी” ही घोषणा पुन्हा दिली. काशी मधील प्रख्यात नागरिकांच्या भेटीगाठीचा कार्यक्रम त्यांनी अखेरच्या टप्प्यात केला, तर अखिलेश यादव यांनी रोड शो करत “सुबह – ए – बनारस”चा नारा दिला. “सुबह – ए – बनारस” मधून अखिलेश यादव यांना नेमका कोणता संदेश द्यायचा आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. हा नारा देऊन त्यांनी बनारस मधील मुस्लिम समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे.

राहुल गांधी यांनी “झूठ नही बोलुंगा” असा नारा वाराणसीच्या पिंडरीत दिला.प्रचार संपल्यानंतर सर्व पक्षांनी आता पत्रकार परिषदांवर भर देत आपणच सत्तेवर येणार असल्याचा दावा केला आहे.

U. P. Elections: Modi’s announcement of “Bhavya Kashi Divya Kashi”; So Akhilesh’s slogan “Subah-e-Banaras

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात