प्रवाशांनी दिला चक्क ट्रेनलाच धक्का ! मेरठमधील आश्चर्यकारक घटना

 

मेरठ : मोटारी, ट्रक यांना धक्का द्यावा लागल्याचे तुम्ही पाहिले असेल. पण, मेरठमधील दौराला रेल्वे स्थानकावररेल्वे प्रवाशांनी पॅसेंजर ट्रेनला ‘दे धक्का’ दिल्याची घटना घडली आहे.Passengers push the train! Amazing events in Meerut

दौराला रेल्वे स्थानकावर आज प्रवाशांची पलटण एका पॅसेंजर ट्रेनला ढकलताना दिसली. भारतीय रेल्वेच्या असहायतेचे हे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. धक्का मारणाऱ्यांना असं का करावं लागलं असे विचारता ते म्हणाले की, आम्ही रेल्वेला धक्का मारून रुळावर आणले तरच आम्हाला प्रवास करता येणार आहे.



आज पहाटे सहारनपूरहून दिल्लीला जाणाऱ्या या पॅसेंजर ट्रेनला सकाळी मेरठमधील दौराला स्टेशनवर अचानक आग लागली. आगीमुळे रेल्वेच्या इंजिनसह दोन डबे जळून खाक झाले. ट्रेनचा ब्रेक जाम झाल्याने हा अपघात झाला होता. मात्र आगीचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

दौराला रेल्वे स्थानकाला लागलेल्या आग लागलेल्या डब्यांव्यतिरिक्त उर्वरित डबे प्रवाशांनी दूर ढकलत नेले. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, प्रवासी ट्रेनला धक्का देताना दिसत आहेत आणि उर्वरित डबे इंजिन आणि दोन डब्यांपासून वेगळे करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

Passengers push the train! Amazing events in Meerut

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात