वृत्तसंस्था
अयोध्या : अयोध्येतील भव्य श्रीराम जन्मभूमी मंदिरातील रामलल्लांच्या मूर्तीसाठीचा शोध पूर्ण झाला आहे. ऑक्टोबर 2023 मध्ये रामजन्मभूमी मंदिराच्या ग्राउंड फ्लोअरच्या बांधकामाची डेडलाइन निश्चित झाल्यानंतर आता रामाच्या मूर्तीचे कोरीव काम वेळेत पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. रामाची मूर्ती साडेपाच फूट उंचीची उभ्या मुद्रेत असेल. त्यासाठी लागणाऱ्या शाळिग्राम शिळेचा शोध पूर्ण झाला आहे. नेपाळमधील गंडकी नदीतून सुमारे 6 लाख वर्षांपूर्वीची अखंड शाळिग्राम शिळा शोधून ती अयोध्येत आणली आहे. शाळिग्राम शिळा भगवान विष्णूरुप मानतात. तिच्या सन्निध लक्ष्मीवासही असतो म्हणून देव देवतांच्या मूर्ती शाळिग्राम शिळेत घडवितात, अशी सनातन धर्मशास्त्रीय अधिमान्यता आहे. Two “Saligram Shilas” have been brought from Nepal for the Ram temple
या शिळेची व्यवस्था करण्यासाठी मंदिर ट्रस्टचे सदस्य कामेश्वर चौपाल यांना नेपाळच्या गंडकी नदी परिसरात पाठवण्यात आले होते. तिथून 7 × 5 फूट आकाराची शाळिग्राम शिळा बाहेर काढण्यात आली असून जनकपूरमध्ये 27 जानेवारी रोजी वसंत पंचमीच्या दिवशी शिळेची पूर्ण विधीपूर्वक पूजा करून ही भारतात आणली.
शिलायात्रेदरम्यान दरभंगा, मधुबनी, मोतिहारी, गोपालगंज आणि गोरखपूर मंदिरात शिळेची पूजा आणि स्वागत केले. यानंतर शाळिग्राम शिळा अयोध्येमध्ये आणली.
उत्तर प्रदेश: राम मंदिर के लिए दो "शालिग्राम शिला" नेपाल से लाई गई हैं। pic.twitter.com/BOem1jTwBR — ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2023
उत्तर प्रदेश: राम मंदिर के लिए दो "शालिग्राम शिला" नेपाल से लाई गई हैं। pic.twitter.com/BOem1jTwBR
— ANI_HindiNews (@AHindinews) February 2, 2023
शाळिग्रामाचे लाभ
कामेश्वर चौपाल म्हणाले की, हा शाळिग्राम शिळा खडक खूप महाग आहे. मात्र, नेपाळ सरकारच्या मदतीने तो मिळवण्यात आला आहे. या शाळिग्राम खडकाला धार्मिक महत्त्व आहे. यामध्ये भगवान विष्णूंचे निवासस्थान असल्याचे धर्मशास्त्र सांगते. शाळिग्राम शिळेत घडधिलेल्या मूर्तीचे सहा प्रकारचे लाभ आहेत. सुखी जीवन, समृद्धी, वाईट शक्तींपासून संरक्षण, उत्तम आरोग्य, वैश्विक आनंद आणि देवाची कृपा हे योग यातून बनतात, अशी सनातन धर्मशास्त्रीय अधिमान्यता आहे. सनातन हिंदू घराघरात शाळिग्रामाचे विष्णूरुप पूजन करतात. त्याच्या विधिवत प्राणप्रतिष्ठेचे गरज नसते.
पुरातत्व विभागाच्या तपासणीनंतर निवड
गंडकी नदीतील हा खडक निवडण्यासाठी नेपाळच्या पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांनी मदत केली, असं कामेश्वर चौपाल यांनी सांगितले. तज्ज्ञांच्या मदतीने उच्च दर्जाच्या दगडाची निवड करण्यात आली आहे. ही शाळिग्राम शिळा सुमारे 6 लाख वर्षे जुनी आहे.
तज्ज्ञ घडवतील रामाची मूर्ती
राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील नामवंत कारागिरांची तीन सदस्यीय पथक रामाच्या मूर्तीचे डिझाईन आणि मॉडेल तयार करण्यासाठी काम करत आहे. उभ्या मूर्तीची अनेक छोटी मॉडेल्स आतापर्यंत आली आहेत. मंदिर ट्रस्ट त्यापैकी कोणत्याही एकाची निवड करेल. ही मूर्ती 5.5 फूट उंच असेल. याच्या खाली सुमारे 3 फूट उंचीचा पेडिस्ट्रियल असेल.
खगोलशास्त्रज्ञ मंदिराच्या रचनेसाठी विशेष व्यवस्था करत आहेत, जेणेकरून राम नवमीच्या दिवशी सकाळी 12.00 वाजता प्रभू राम जन्म झाल्यावर सूर्याची किरणे राम लल्लाच्या कपाळावर पडून ती प्रकाशमान होतील. पुढील वर्षी जानेवारीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भव्य राम मंदिरात रामलल्लांच्या अभिषेकाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे, अशी माहितीही चंपत राय यांनी दिली.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App