विशेष प्रतिनिधी
तिरुअनंतपुरम : हत्तींमध्ये आढळणाऱ्या ‘एन्डोथेलियोट्रॉपिक हर्पस’ या विषाणूमूळे कोत्तूर येथील हत्ती पुनर्वसन केंद्रात अर्जुन या हत्तीच्या चार वर्षांच्या पिल्लाचा मृत्यू झाला. विषाणूचा संसर्ग झाल्यानंतर अर्जुनचा ४८ तासांतच मृत्यू झाला, असे पशुवैद्यकीय डॉक्टरांनी सांगितले. Two elephants died in kerala
हत्तीच्या पिल्लांच्या मृत्यूची ही गेल्या दोन आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. याआधी ‘श्रीकुट्टी’ नावाच्या पिल्लाचाही ‘हर्पस’मुळे मृत्यू झाला होता. अजून दोन पिल्लांमध्ये या विषाणूचे निदान झालेले असून एका पिल्लात लक्षणे दिसून येत आहेत. हर्पस अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ‘पोडीची’ या मादी हत्तीला विलगीकरणात ठेवण्यात आले. प्रकृती बिघडलेल्या कन्नान नावाच्या पिल्लाची प्रकृती सुधारत आहे, अशी माहिती तिरुअनंतपुरमच्या वन्यजीव अधिकाऱ्यानी दिली. पुनर्वसन केंद्रात दहा पिल्ले आहेत. त्यांच्यावर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App