विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – ‘ट्विटर’ या मायक्रोब्लॉगिग प्लॅटफॉर्मने अखेर नव्या माहिती तंत्रज्ञान नियमांची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. यान्वये मुख्य अनुपालन अधिकारी, निवासी तक्रार अधिकारी आणि मुख्य नोडल व्यक्तीची कायमस्वरूपी नेमणूक करण्यात आली आहे. कंपनीकडून दिल्ली उच्च न्यायालयात याची माहिती देण्यात आली. Twitter will follow govt norms
दुसरीकडे न्यायालयाने मात्र ट्विटरने सादर केलेले शपथपत्र हे अद्याप रेकॉर्डवर आलेले नसून ते रेकॉर्डवर आणण्याचे आदेश कंपनीला दिले आहेत.केंद्र सरकारची बाजू मांडणारे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी आम्ही कंपनीच्या या म्हणण्याची खातरजमा करू इच्छितो असे सांगितले.
याआधी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने ट्विटर इंडियाने या अधिकाऱ्यांची केवळ कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती केल्याने नाराजी व्यक्त केली होती. अशाप्रकारच्या नियुक्त्यांच्या माध्यमातून कंपनी नव्या आयटी नियमांना बगल देत असल्याचेही कोर्टाने म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App