प्रतिनिधी
पणजी : हिजाबच्या मुद्द्यावरून देशभर राजकीय रणकंदन सुरू असताना आणि दोन तट पडले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यांनी आज सायंकाळी गोव्याच्या भूमीवरून सेक्युलॅरिझम अर्थात धर्मनिरपेक्षता या मुद्द्यावर अत्यंत महत्त्वपूर्ण भाष्य केले.True secularism is to provide 100% benefits of government schemes to all poor, victims and deprived: Modi
म्हापशात येथे जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, की देशातल्या सर्व समाजामधील गरीब, वंचित, पीडित यांना भेदभाव न करता 100% सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे म्हणजेच खरी धर्मनिरपेक्षता आहे. “सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास” हाच खऱ्या अर्थाने सेक्युलॅरिझम आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केले.
आज दिवसभर उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गोवा या तीन राज्यांमध्ये मोठमोठ्या जाहीर सभांना त्यांनी संबोधित केले. उत्तर प्रदेशात सहारनपूर मध्ये उत्तराखंडात श्रीनगरमध्ये तर गोव्यात म्हापशात येथे मोदींनी जाहीर सभा घेतल्या. या प्रत्येक ठिकाणी त्यांनी परिवारवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले.
म्हापशातील सभेत त्यांनी आपल्याच राज्यसभेतील भाषणाचा उल्लेख केला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 15 वर्षे गोव्याला स्वातंत्र्यापासून वंचित राहावे लागले कारण पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी गोवा मुक्तीसाठी भारताची फौज पाठवली नाही. गोव्यातल्या सत्याग्रहींना मदत केली नाही, असा आरोपही त्यांनी केला. त्याच वेळी त्यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावर महत्त्वाचे भाष्य करून तथाकथित पुरोगामी आणि लिबरल विचारवंतांनाही ठोकून काढले. “ते” सांगतात ती खरी धर्मनिरपेक्षता नाही, तर सरकारी योजनांचे लाभ सर्व समाजाला मधल्या गरीब वंचित पीडित लोकांपर्यंत 100% पोहोचविणे म्हणजे खरी धर्मनिरपेक्षता आहे.
गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सरकारच्या सर्व योजना सर्व गरीब वंचित समाजापर्यंत 100% पोहोचविल्या आहेत. गोव्यात 100% लसीकरण झाले आहे. राज्यातल्या सर्व गरिबांना मोफत धान्य मिळाले आहे. गोव्याने स्वच्छ भारत अभियान 100% यशस्वी करून दाखविले आहे. ही डाॅ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील सर्वात मोठी कामगिरी आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App