विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: काँग्रेसचे खासदार शशी थरूर प्रकांड पंडीत आणि त्यांच्या विस्तृत शब्दसंग्रहासाठी ओळखले जातात. त्यांचे अनेक इंग्रजी शब्द भल्या भल्यांनाही समजत नाहीत. परंतु, शशी थरुर यांना केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी इंग्रजी स्पेलींगचे धडे दिले. अनावश्यक दावे करताना चुका होतात असा टोलाही लगावला.Ramdas Athavale gave English spelling lessons to Shashi Tharoor, a great English scholar
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करतानाचा एक फोटो शशी थरुर यांनी ट्विट केला होता. त्यामध्ये आठवले यांनी तोंडाचा आ वासल होता. त्यांनी म्हटले होते की जवळपास दोन तासांच्या बजेट चर्चेवर काय प्रतिक्रिया आहे हे मंत्री रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील स्तब्ध आणि अविश्वसनीय भाव हे सर्व सांगून जातात. अर्थव्यवस्थेबद्दल आणि त्यांच्या बजेटबद्दल निर्मला सीतारामन यांच्या दाव्यांवर ट्रेझरी बेंचही विश्वास ठेवू शकत नाहीत!
मात्र हे ट्विट करताना शशी थरुर यांचे ‘रिप्लाय’ या शब्दाचे स्पेलींग चुकले आहे. त्यांनी रिलाय असे लिहिले आहे. तर बजेट या शब्दाचे स्पेलींगही चुकीचे लिहिले आहे. बीयूडीजेईटी याऐवजी बीयूडीजेईटी असे स्पेलींग लिहिले होते.
आठवले यांनी थरुर यांची हिच चूक पकडत त्यांना इंग्रजीचे धडे दिले. त्यांनी म्हटले आहे की प्रिय शशी थरूर जी, अनावश्यक दावे आणि विधाने करताना चुका होणारच. हे बायजेट नसून बजेट आहे. रिलाय नसून रिप्लाय असते.शशी थरुर यांची आठवले यांनी शाळा घेतल्याने ट्विटरला चांगलीच करमणूक होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App