पश्चिम बंगालमधील चार महापालिकांच्या निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे. येथे 12 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, TMC विधाननगर महापालिकेत 41 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या आणि 10 वर आघाडीवर होती. या पार्श्वभूमीवर येथेही टीएमसीचा विजय निश्चित झाला आहे, असे म्हणता येईल. Trinamool’s resounding victory in four municipal elections in West Bengal, says Mamata
वृत्तसंस्था
कोलकाता : पश्चिम बंगालमधील चार महापालिकांच्या निवडणुकीत टीएमसीने मोठा विजय मिळवला आहे. येथे 12 फेब्रुवारी रोजी मतदान झाले होते. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, TMC विधाननगर महापालिकेत 41 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या आणि 10 वर आघाडीवर होती. या पार्श्वभूमीवर येथेही टीएमसीचा विजय निश्चित झाला आहे, असे म्हणता येईल.
ममता बॅनर्जी यांनी ट्विट करून म्हटले की, ‘पुन्हा एकदा विजय. हा माँ माटी मानुषचा विजय आहे. आसनसोल, विधाननगर, सिलीगुडी आणि चंदननगर येथील जनतेचे मी मनापासून अभिनंदन करते. TMC वर विश्वास दाखवणाऱ्या सर्वांची मी आभारी आहे.
We are committed to carry forward our development work further with greater zeal and enthusiasm. My sincerest gratitude to Ma Mati Manush. — Mamata Banerjee (@MamataOfficial) February 14, 2022
We are committed to carry forward our development work further with greater zeal and enthusiasm. My sincerest gratitude to Ma Mati Manush.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) February 14, 2022
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने आसनसोल महापालिकेत 43 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला केवळ एक जागा मिळाली. आसनसोल महापालिकेत सीपीआयएमला दोन तर भाजपला तीन जागा मिळाल्या आहेत.
TMC: 43 जागा सीपीआयएम : 2 जागा भाजप : ३ जागा काँग्रेस : १ जागा
ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने सिलीगुडी, विधाननगर, चंदननगर आणि आसनसोल महापालिका निवडणुकीच्या निकालात आघाडी मिळवली आहे. तर भारतीय जनता पक्ष (भाजप) या सर्व महापालिकांमध्ये पिछाडीवर आहे.
सिलीगुडी (३५/४७) टीएमसी-31, भाजप-2, LF-1, कॉंग्रेस-1
विधाननगर (४१/४१) टीएमसी-39, काँग्रेस-1, इतर-1
चंदननगर (२०/३३) टीएमसी-19, LF-1
आसनसोल (५५/१०६) टीएमसी- 50, भाजप- 4, इतर-1
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App