तृणमूळच्या हिंसाचाराने दिशा बदलली; पेट्रोल – डिझेल दरवाढीचा गाड्या जाळून निषेध


वृत्तसंस्था

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालानंतर प्रचंड हिंसाचार माजवून अख्ख्या राज्यात दहशत पसरवणाऱ्या तृणमूळ काँग्रेसने हिंसाचाराची दिशा बदलली असून आता त्या पक्षाचे गुंड लोकांच्या गाड्या जाळून पेट्रोल – डिझेल दरवाढीचा निषेध करत आहेत.Trinamool violence changed direction; Petrol-diesel price hike protest by burning cars

हिंसाचारग्रस्त २४ परगणा जिल्ह्यातील सागरमध्ये मंदिरतळा बाजारमध्ये तृणमूळच्या झेंड्याखाली एकत्र येत जमावाने गाड्या आणि टायर जाळल्या आणि आपण केंद्र सरकारने लादलेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीचा निषेध करतोय, असे सांगितले.



प्रत्यक्षात या आंदोलानाच्या पध्दतीने मंदिरतळा बाजार परिसरात दहशत पसरली आणि व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली. तृणमूळचे झेंडे आणि पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधातील फलक हातात घेऊन जमावाने बाजारात फेरी मारली. त्याचवेळी हे आंदोलन नसून हा दहशत माजवण्याचा नवा प्रकार असल्याचे मंदिरतळा बाजारातील व्यापाऱ्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी दुकाने बंद केली.

जमावाने बाजाराच्या चौकात तिथल्या गाड्यांचे टायर काढले. त्यांचा एक ढिग बनवून तो पेटवून दिला. नंतर काही गाड्या देखील पेटविल्या. हे कृत्य करताना जमावातील काही लोक केंद्र सरकारच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा देत होते.

गाड्या पेटवून दिल्यावर जमावातल्या काही लोकांनी मातीच्या चुलीवर काही कालवण शिजवण्याचा प्रयत्न केला आणि हे आंदोलन पेट्रोल – डिझेल दरवाढीविरोधात असल्याचे भासविले. प्रत्यक्षात हा दहशत माजविण्याचा नवा प्रकार होता.

Trinamool violence changed direction; Petrol-diesel price hike protest by burning cars

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात