विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणात मोठा उलटफेर होऊन काँग्रेसच्या ऐवजी भाजपने तिथे बाजी मारली. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भाजप 49 जागांवर आघाडीवर असून काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला असून तिथे पक्ष तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याची चिन्हे दिसत आहेत. हरियाणातल्या जनतेने एक्झिट पोलचे सगळे निष्कर्ष अपयशी ठरवले आहेत. Trends in Haryana unacceptable to Congress
मात्र हरियाणातले हे ट्रेंड्स काँग्रेसला मान्य नसून काँग्रेसने निवडणूक आयोगाविरुद्ध तक्रारी करायला सुरुवात केली आहे. निवडणूक आयोगाकडे प्रत्यक्ष तक्रार करण्याची तयारी देखील काँग्रेसने केल्याची माहिती पक्षाचे मुख्य प्रवक्ते जयराम रमेश आणि सुप्रिया श्रीनेत यांनी दिली.
हरियाणा मध्ये मतमोजणीचे 10 – 12 राऊंड पूर्ण होऊन त्याचे आकडे बाहेर आले असताना प्रत्यक्ष निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर फक्त पहिल्या 4 – 5 राऊंड्चेच आकडे दिसत आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून काही गडबड सुरू आहे. त्या विरुद्ध आम्ही तक्रार करणार आहोत, असे जयराम रमेश यांनी सांगितले.
मात्र, हरियाणामध्ये भाजपने छत्तीसगड मधला परफॉर्मन्स रिपीट केल्याचेच चित्र समोर आले आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसची पुन्हा सत्ता येईल, असे निष्कर्ष एक्झिट पोलने काढले होते. परंतु, प्रत्यक्षात तिथे भाजपने बाजी मारली. हरियाणा देखील सर्व एक्झिट पोलने काँग्रेसच्याच बाजूने कौल दाखवला होता. काँग्रेसला 44 ते 54 जागा मिळतील, असा निष्कर्ष एक्झिट पोलने दाखविला होता. परंतु, प्रत्यक्षात भाजपने 49 जागांवर मुसंडी मारून सगळे एक्झिट पोलचे निष्कर्ष डब्यात घातले. त्यामुळे काँग्रेसचे नेते संतप्त होऊन निवडणूक आयोगावर बरसायला लागले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App