आजपासून 60 रुपये किलोने मिळणार टोमॅटो, सरकारने केली मोठी घोषणा!

पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवक नगण्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टोमॅटो सतत महाग होत आहेत. Tomatoes will be available at 60 rupees per kg from today the government has made a big announcement

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : टोमॅटोच्या सततच्या वाढत्या दराने लोकांना रडवले आहे. पण आता काळजी करण्याची गरज नाही. कारण लवकरच टोमॅटोचे भाव मूळ स्वरुपात परततील. कारण सरकारने मोठी घोषणा करत संपूर्ण देशात टोमॅटो 60 रुपये किलोने विकण्याची घोषणा केली आहे.

सध्या टोमॅटोचे भाव 100 रुपये किलोच्या पुढे गेले आहेत. त्यामुळे मध्यमवर्गीयांच्या ताटातून टोमॅटो हळूहळू गायब होताना दिसत आहेत. सरकार रेशन दुकानातून टोमॅटो विकणार आहे. तसेच लोकांना कमी दरात टोमॅटो उपलब्ध करून देण्याचे काम करणार आहे.

ग्राहक व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, 25 जुलै रोजी टोमॅटोची किरकोळ किंमत 60 रुपये प्रति किलो इतकी होती. मात्र अवघ्या चार दिवसांत टोमॅटोने शंभरचा टप्पा ओलांडला आहे. टोमॅटोच्या वाढत्या किमती सरकारने गांभीर्याने घेतल्या आहेत. तसेच सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. सरकारने टोमॅटोची देशभरात 60 रुपये किलोने विक्री करण्याची घोषणा केली आहे. एवढेच नाही तर त्याची जबाबदारी राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ म्हणजेच NCCF वर देण्यात आली आहे. एनसीसीएफ 29 जुलैपासून आपल्या केंद्रांवरून सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू करणार आहे.

गेल्या तीन दिवसांत टोमॅटोच्या दरात किलोमागे 40 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे लोकांना टोमॅटो खरेदी करणे कठीण झाले आहे. पावसामुळे बाजारात टोमॅटोची आवक नगण्य झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे टोमॅटो सतत महाग होत आहेत. NCCF ने निवेदनात म्हटले आहे की ही सुविधा 29 जुलै 2024 रोजी सुरू होईल आणि येत्या काही दिवसांत हळूहळू दिल्ली-NCR मधील इतर ठिकाणी विस्तारित होईल.

Tomatoes will be available at 60 rupees per kg from today the government has made a big announcement

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात