महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवरील सर्वोच्च सुनावणीचा आज शेवटचा दिवस!


सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवस  सुरू असलेली सुनावणी अखेर आज संपणार आहे आणि सर्वांना आता निकालाची उत्सुकता आहे.

प्रतिनिधी

नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून सुरू असलेली महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरी सुनावणी अखेर आज संपणार आहे. आज सुनावणीचा शेवटचा दिवस आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड, न्या. हिमा कोहली, न्या. कृष्ण मुरारी, न्या. एम. आर. शहा आणि न्या. पी. एस. नरसिंहा यांच्या घटनापीठासमोर ही सुनावणी होत आहे. ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे युक्तिवाद पूर्ण झाले आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय निकालासाठी काय तारीख देणार याची सर्वांना उत्सुकता आहे. Today is the last day of the supreme hearing on the power struggles of Maharashtra

कालच्या सुनावणीत शिंदे गटाच्यावतीने वकील हरीश साळवे, नीरज कौल, महेश जेठमलानी आणि मिनंदर सिंह यांनी जोरदार युक्तीवाद केला.  तर आज राज्यपालांच्यावतीने महाअधिवक्ता तुषार मेहता हे युक्तीवाद करणार आहेत. यानंतर ठाकरे गटाच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल व अभिषेक मून सिंघवी स्पष्टीकरणाचे मुद्दे मांडतील.

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही – सर्वोच्च न्यायालयात शिंदे गटाचे वकील हरीश साळवेंचा जोरदार युक्तीवाद

”बहुमताची मोजणी राजभवनात होऊ शकत नाही, ती विधानसभेतच व्हायला हवी. उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणीसाठी पाचारण करून राज्यपालांनी काहीही चुकीचं केलेलं नाही. राजीनामा दिलेल्या मुख्यमंत्र्यांना हे न्यायालय पुन्हा बोलवू शकत नाही. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे द्याच पण अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी विहित कालावधी देखील द्या, अशी मागणी हरीश साळवे यांनी केली आहे. तसेच, उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांना स्वीकारावा लागला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर शिंदेंनी बहुमत सिद्ध केलं. बहुमत बळाच्या जोरावर झालं, असं कसं म्हणता येईल? जोपर्यंत अपात्र होत नाहीत, तोपर्यंत आमदार काम करू शकतात. विधानसभा अध्यक्ष हे घटनात्मक पद आहे. राजकीय पक्षाचं अस्तित्वच विधिमंडळ पक्षावर अवलंबून असतं. नेत्याला प्रश्न विचारणे म्हणजे बंड नाही. त्यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार असतो. अशा स्थितीत जर पक्षनेत्याला त्यांनी सवाल विचारले तर त्यांचं चुकलं कुठे?” असंही ते काल म्हणाले आहेत.

Today is the last day of the supreme hearing on the power struggles of Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात