पूर्वी मनाेरंजानची साधने हातात उपलब्ध नसल्याने मैदानावर मुले खेळत हाेती. परंतु आता माेबाईल, लॅपटाॅप, टीव्ही अशा अनेक गाेष्टी मनाेरंजनाकरिता मुलांकडे आल्याने मैदानावर खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांचा सर्वांगीण विकास हाेण्याकरिता तसेच त्यांच्या शारिरिक क्षमता वाढविण्यासाठी मुलांचे जीवनात खेळ महत्वपूर्ण असल्याचे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक गाेपीचंद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
विशेष प्रतिनिधी
पुणे – मुलांच्या शारिरिक क्षमताबाबत आपल्याकडे अजूनही माेठया प्रमाणात अज्ञान आहे. पूर्वी मनाेरंजानची साधने हातात उपलब्ध नसल्याने मैदानावर मुले खेळत हाेती. परंतु आता माेबाईल, लॅपटाॅप, टीव्ही अशा अनेक गाेष्टी मनाेरंजनाकरिता मुलांकडे आल्याने मैदानावर खेळ खेळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. मुलांचा सर्वांगीण विकास हाेण्याकरिता तसेच त्यांच्या शारिरिक क्षमता वाढविण्यासाठी मुलांचे जीवनात खेळ महत्वपूर्ण असल्याचे मत भारतीय बॅडमिंटन संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक गाेपीचंद यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. To develop the physical capacity of children sports is important in his life says National Badminton coach gopichand
गेरा डेव्हलपमेंटच्या वतीने ‘मीट द चॅम्पियन’ या उपक्रमा अंर्तगत चाइल्ड सेन्ट्रिक हाेम्सच्या उदघाटन प्रसंगी ते बाेलत हाेते. यावेळी गेरा डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक राेहित गेरा उपस्थित हाेते.
गाेपीचंद म्हणाले, खेळाडू ते प्रशिक्षक यादरम्यानचा माझा प्रवास हा खेळातून विकसित झालेला अाहे. खेळाच्या माध्यमातून नेतृत्वगुण विकसित हाेणे, आत्मविश्वास निर्माण हाेणे, प्राेत्साहन मिळणे, निर्णय क्षमता , दूरदृष्टी, सांघीक काम आदी गुण विकसित हाेऊन त्याचा जीवनात ही वापर हाेताे. मात्र, मुले सध्या घर साेडून मैदानावर खेळण्यासाठी जात नाही हे एक माेठे आव्हान समाजा समाेर निर्माण झाले आहे.
केवळ शिक्षण घेणे म्हणजेच साक्षरता नसून जीवनातील विविध संधीत सहभागी हाेणे ही साक्षरता आहे. आजकाल मुलांच्या सुरक्षेच्या प्रश्नावरुनही मुलांना घराबाहेर पडू दिले जात नाही ही बाब ही खेदपूर्ण आहे. मुलांनी केवळ डाॅक्टर, इंजिनिअर हाेण्यापेक्षा त्यांनी इतरही क्षेत्रात करिअर करावे याकरिता पालकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. खेळाच्या माद्यमातूनही करिअर करता येऊ शकते कारण दिवसागणिक खेळाला महत्व प्राप्त हाेत असून वेगवेगळया या क्षेत्रातील करिअरच्या संधी समाेर येत आहे. मुलांना घराजवळ खेळाच्या संधी सहजपणे उपलब्ध हाेणे हे मुलांच्या भविष्याचे दृष्टीने आवश्यक आहे.
गेरा डेव्हलपमेंटचे संचालक राेहित गेरा म्हणाले, चाइल्ड सेंट्रिक हाेम्सच्या माद्यमातून पालकांना घर घेताना साेसायटीच्या आवारातच खेळाच्या पायाभूत सुविधा देण्याकरिता अाम्ही प्रयत्न करत आहे. नृत्य, गायन, पाेहणे, टेनिस, फुटबाॅल, क्रिकेट आदी पर्याय मुलांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मुलांना विविध क्षेत्रात चांगल्या प्रकारे मार्गदर्शन मिळावे याकरिता उत्तम प्रशिक्षक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App