विशेष प्रतिनिधी
कोलकता – भाजपने २०१४च्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जाहीरनाम्यात महिला आरक्षण विधेयकाचे आश्वासन दिले होते, पण ते अद्याप मंजूर झाले नाही. यात भाजप अनुत्तीर्ण ठरला आहे,‘ अशी टीका तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी केली आहे.TMC targets BJP on women’s reservation bill
ओब्रायन राज्यसभेतील खासदार तसेच तृणमूलचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महिला आरक्षण विधेयक संसदेत सादर होण्याच्या घटनेला आज २५ वर्षे पूर्ण झाली. ते अद्याप मंजूर झालेले नाही.
महिलांना संसद आणि राज्यांच्या विधानसभांत ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव या विधेयकात आहे. याबाबत ओब्रायन यांनी म्हटले आहे की, संसदेत महिलांच्या प्रतिनिधीत्वाची जगातील टक्केवारी २५ इतकी आहे.
हीच आपल्याकडील राष्ट्रीय टक्केवारी १३ इतकीच आहे. संसदेतील भाजपच्या महिला सदस्यांची टक्केवारी १० ते ११ इतकीच आहे. हेच आमच्या पक्षाच्या संसदेतील दोन्ही सभागृहांतील सदस्यांत सुमारे ४० टक्के महिला आहेत.
महत्त्वाच्या बातम्या.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App