राहुल गांधींनी मोबाईलमध्ये शूट केला व्हिडीओ, अन्य खासदार वाजवत होते टाळ्या
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेच्या सुरक्षेबाबत सरकार आणि विरोधकांमध्ये वाद सुरूच आहे. मंगळवारी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. गोंधळ घालणाऱ्या अनेक विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले.TMC MP imitated Rajya Sabha Speaker Jagdeep Dhankhad inside Parliament premises
दरम्यान,TMC खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या संकुलात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची नक्कल केली. टीएमसीचे खासदार मिमिक्री करत असताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक पक्षांचे खासदार उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसदेच्या संकुलात राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांची खिल्ली उडवली. बॅनर्जी यांनी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक विरोधी खासदारांच्या उपस्थितीत संसदेच्या पायऱ्यांवर झालेल्या आंदोलनादरम्यान धनखड यांची खिल्ली उडवली.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी देखील या ठिकाणी उभे होते आणि त्यांच्या मोबाईलवर बॅनर्जी धनखरड यांची नक्कल करतानाचा व्हिडिओ बनवताना दिसले. यावेळी राजदचे खासदार मनोज झा यांच्यासह अनेक खासदार टाळ्या वाजवताना दिसले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App