वृत्तसंस्था
नवी दिल्ली : Waqf Bill वक्फ विधेयकाबाबत सुरू असलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) बैठकीत मंगळवारी बराच गदारोळ झाला. सूत्रांनुसार, विधेयकावरील चर्चेदरम्यान तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार व निवृत्त न्यायाधीश अभिजित गंगोपाध्याय यांच्यात जोरदार वाद झाला. यानंतर बॅनर्जी यांनी टेबलावरील काचेची बाटली आदळली.Waqf Bill
यामुळे ती फुटली आणि तुटलेली बाटली जेपीसी अध्यक्ष आणि भाजप खासदार जगदंबिका पाल यांच्या त्यांनी दिशेने भिरकावली. पाल यांना काचेचे तुकडे लागले नाहीत. मात्र, बॅनर्जी यांच्या दोन बोटांना दुखापत झाली आहे. या वेळी अनेक सेवानिवृत्त न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सुप्रसिद्ध व्यक्ती सूचना देण्यासाठी उपस्थित होते. यानंतर तेथे उपस्थित असलेले एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी,आप नेते संजय सिंह यांनी कल्याण बॅनर्जी यांना प्राथमिक उपचारासाठी नेले. काही वेळाने बैठक पुन्हा सुरू झाली तेव्हा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बॅनर्जींच्या असभ्यतेविरुद्ध निषेध प्रस्ताव मांडला, जो ९-८ ने मंजूर झाला. बॅनर्जी यांना १ दिवस निलंबित केले.
सूत्रांनुसार, ओडिशाचे निवृत्त न्यायाधीश व वकील बैठकीत वक्फ विधेयकावर चर्चा करत असताना वाद सुरू झाला. तेव्हा विरोधी पक्षांनी या विधेयकात त्यांचा सहभाग काय, असा सवाल केला. बॅनर्जी आधीच तीन वेळा बोलले आणि मधेच बोलू लागल्यावर गंगोपाध्याय यांनी अडवले, त्यावर बॅनर्जी संतापले.
पाल यांना काचेचे तुकडे लागले नाहीत. मात्र, बॅनर्जी यांच्या दोन बोटांना दुखापत झाली आहे. या वेळी अनेक सेवानिवृत्त न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि सुप्रसिद्ध व्यक्ती सूचना देण्यासाठी उपस्थित होते. यानंतर तेथे उपस्थित असलेले एआयएमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी,आप नेते संजय सिंह यांनी कल्याण बॅनर्जी यांना प्राथमिक उपचारासाठी नेले. काही वेळाने बैठक पुन्हा सुरू झाली तेव्हा भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी बॅनर्जींच्या असभ्यतेविरुद्ध निषेध प्रस्ताव मांडला, जो ९-८ ने मंजूर झाला. बॅनर्जी यांना १ दिवस निलंबित केले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App