विरोधकांची एकजुटीसाठी धडपड सुरू असताना राजकीय वर्तुळात तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : ईव्हीएमच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षनेत्यांची आज बैठक झाली. मात्र या बैठकीकडे तृणमूल काँग्रेसने पाठ फिरवल्याचे दिसून आले. या बैठकीत तृणमूल काँग्रेसच्यावतीने कोणीच सहभागी झाले नव्हते. TMC did not join the meeting of Opposition leaders at the residence of NCP chief Sharad Pawar
त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष एकजुटीसाठी धडपडत असताना, आता तिसऱ्या आघाडीच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. कारण, म्हणजे ममता बॅनर्जींनी आज भुवनेश्वर येथे जाऊन ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचीही भेट घेतली आहे. समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांचीही त्यांनी नुकतीच भेट घेतली होती, तर उद्या त्या कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांची भेट घेणार असून, या महिन्याच्या अखेरीस दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची त्या भेट घेणार आहेत.
Lok Sabha Election 2024 : ममता बॅनर्जी आणि नवीन पटनायक यांच्यात खलबतं; तिसऱ्या आघाडीच्या चर्चांना उधाण!
आज दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल, समाजवादी पक्षाचे रामगोपाल यादव आणि कपिल सिब्बल, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, ठाकरे गटाचे अनिल देसाई आदी विरोधी पक्षांचे नेते सामील झाले होते. खरेतर शरद पवार यांनी बैठकीपूर्वी विरोधी पक्षनेत्यांना पत्र लिहून ईव्हीएम हॅकिंगच्या मुद्द्यावर चर्चेचे निमंत्रण दिले होते.
TMC did not join the meeting of Opposition leaders at the residence of NCP chief Sharad Pawar in Delhi today. The meeting was called over the "credibility of EVMs" — ANI (@ANI) March 23, 2023
TMC did not join the meeting of Opposition leaders at the residence of NCP chief Sharad Pawar in Delhi today. The meeting was called over the "credibility of EVMs"
— ANI (@ANI) March 23, 2023
शरद पवारांच्या पत्रात काय? –
शरद पवारांनी या पत्रात लिहिले की, ईव्हीएमवर उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे देण्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी आश्वासन दिले होते. “चीप असलेले कोणतेही मशीन हॅक केले जाऊ शकते आणि हे नाकारले जाऊ शकत नाही. आपण लोकशाहीला असे हायजॅक होऊ देऊ शकतो का? जे हे करत आहेत, त्यांना हे करू द्यायचे का? निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष करण्यासाठी, आपण एकत्र बसून आयटी व्यावसायिक आणि क्रिप्टोग्राफर काय म्हणतात ते ऐकले पाहिजे.”
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App