शरद पवारांच्या घरी फार मोठ्या खलबतांच्या बातम्या, प्रत्यक्षात इव्हीएमच्या नियमित तक्रारींबाबत बैठक!!; विरोधकांचे दुसऱ्या फळीतले नेते हजर

प्रतिनिधी

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन बद्दल नियमित तक्रारींसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 6 जनपथ या राजधानी नवी दिल्लीतील निवासस्थानी आज सायंकाळी विरोधी पक्षांची बैठक झाली. Meeting of opposition at sharad Pawar’s residence in delhi, matter of EVM discussed

या बैठकीला विरोधी पक्षांचे दुसऱ्या फळीतले नेते हजर होते. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन कशा पद्धतीने म्यॅन्युप्युलेट होऊ शकते, याबद्दल काही तज्ञांनी प्रात्यक्षिक सादर केले. त्याची माहिती या बैठकीनंतर शरद पवार, कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह आदी नेत्यांनी पत्रकारांना दिली. मात्र, ही बैठक सुरू असताना शरद पवारांच्या घरी फार मोठी खलबते सुरू असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या होत्या. प्रत्यक्षात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात नियमित तक्रारींविषयी ही बैठक होती.

अमेरिकेसह युरोपीय देशांमध्ये सर्वत्र बॅलेट पेपरवर निवडणुका होतात. मतदान होते. त्यामुळे तेथे कोणताही संशय राहत नाही. परंतु, भारतात मात्र बॅलेट पेपर वर मतदान बंद करून लोकसभा आणि विधानसभा निवडणुका फक्त इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे होतात. त्यामुळे लोकांमध्ये संशय वाढतो. आतापर्यंत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत. निवडणूक आयोगाने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात कधीही स्पष्ट खुलासे केलेले नाहीत, असा दावा विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या शंका संदर्भात सर्व विरोधक पुन्हा एकदा निवडणूक आयोगाला भेट देऊन आपल्या शंका आयोगापुढे मांडणार आहेत आणि आयोगाकडून त्यांनी लेखी उत्तर अपेक्षित ठेवले आहे. लेखी उत्तर दिल्यानंतर सर्व विरोधी पक्ष पुढची कोर्स ऑफ ॲक्शन ठरवतील, असे वक्तव्य कपिल यांनी केले आहे.

इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन मध्ये घोळ होतो. प्रत्येक वेळेला मत कोणालाही दिले तरी ते भाजपला जाते असे आढळून आल्याचा दावा सर्व विरोधकांनी केला आहे.

फार मोठ्या खलबतांच्या नुसत्याच बातम्या

आता आज शरद पवारांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्यानंतर विरोधी पक्ष नेते प्रत्यक्षात निवडणूक आयोगाला केव्हा भेटणार आणि निवडणूक आयोग त्यांना त्यांच्या शंका बाबत लेखी उत्तर केव्हा देणार यावर विरोधकांचा पुढचा ॲक्शन प्लॅन ठरणार आहे. शरद पवार यांच्या निवासस्थानी झालेली बैठक इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन संदर्भात होती, असा स्पष्ट खुलासा शरद पवार, कपिल सिब्बल आणि दिग्विजय सिंह यांनी केला असला तरी मराठी माध्यमांनी मात्र दिल्लीत फार मोठी राजकीय घडामोडी घडली असून शरद पवार यांच्या घरी मोठी खलबते सुरू असल्याचे दावे करून बातम्या दिल्या होत्या. परंतु पवारांच्या घरी इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन संदर्भातील नियमित तक्रारी विषयी बैठक होती, असे त्यांच्याच पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले आहे.

बैठकीला दुसऱ्या फळीतले नेते हजर

या बैठकीला कपिल सिब्बल, दिग्विजय सिंह, समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव, कम्युनिस्ट पक्षाचे नेते डी. राजा, ठाकरे गटाचे नेते अनिल देसाई, राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे, भारत राष्ट्र समितीचे खासदार के. केशवराव हे सगळे दुसऱ्या फळीतले नेते उपस्थित होते.

Meeting of opposition at sharad Pawar’s residence in delhi, matter of EVM discussed

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात