विशेष प्रतिनिधी
कोलकता – पश्चिम बंगालमधील भवानीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कोलकत्यातील निवासस्थानाजवळ प्रचाराला पोलिसांनी परवानगी न दिल्याचा आरोप भाजपने केला. यामुळे तृणमुल व भाजप पुन्हा आमने सामने ठाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे.TMC – BJP once again targets each other
ममता बॅनर्जी स्वत: ही पोटनिवडणुक लढवित असल्याने ती प्रतिष्ठेची बनली आहे. येत्या ३० तारखेला मतदान होणार आहे.कोलकत्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या हरिश चॅटर्जी रस्त्यावर प्रचारापासून रोखल्याचा दावा भाजपचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी केला.
या पोटनिवडणुकीत तृणमूलला पराभवाची भीती असल्यानेच पोलिसांनी भाजपला प्रचारापासून रोखल्याचा आरोपही त्यांनी केला.मात्र, कोलकत्याचे पोलिस उपायुक्त (दक्षिण) आकाश माघारिया यांनी हा आरोप फेटाळला.
ते म्हणाले, की भाजप कार्यकर्त्यांकडे लसीकरणाची प्रमाणपत्रे नव्हती. त्याचप्रमाणे, कडक सुरक्षाव्यवस्था असणाऱ्या भागात प्रवेश करत असल्याने त्यांना संबंधित रस्त्यावरून दुसरीकडे नेण्यात आले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App