विशेष प्रतिनिधी
कानपूर : उत्तर प्रदेशातील एका धक्कादायक प्रकारात वाहतूक पोलीस असलेल्या नातेवाईकाच्या लैंगिक शोषणाला वैतागून एका महिलेने गंगा नदीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. पाणबुडे आणि पोलिसांनी धाव घेऊन तिला वाचविले. महिलेच्या तक्रारीवरून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.Tired of being sexually abused by police uncle, the woman jumped into the river, raped several times
पीडित महिला मिझार्पूरची रहिवासी आहे. तिने असा आरोप केला की, असलेल्या वाहतूक हेड कॉन्स्टेबल असलेल्या आत्याच्या पतीने जानेवारी २०१९ मध्ये कुंभमेळ्यासाठी कुटुंबियांना बोलावले होते. अलाहाबादेत मामा मला एका हॉटेलात घेऊन गेला.
तेथे गुंगीचे औषध मिसळलेले शीतपेय दिले. बेशुद्ध झाल्यानंतर त्याने बलात्कार केला त्याचा व्हिडिओ बनविला. त्यानंतर मामाने गेल्या दोन वषार्पासून अलाहाबाद आणि कानपूरमध्ये अनेकदा बलात्कार केला. गर्भवती राहिल्याचे कळल्यानंतर त्याने गर्भपाताची गोळी दिली.
आरोपी आणि त्याच्या मुलाने कानपूरमधील चाकेरी परिसरातील एका खोलीत नेऊन आणखी धाक दाखविण्यासाठी आणखी एक व्हिडिओ बनविला. तिने विरोध केला असता, त्यांनी मारहाण केली आणि गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. कशीबशी त्यांच्या तावडीतून पळ काढल्यानंतर पीडित महिलेने पोलीस हेल्पलाईन नंबरवर फोन केला आणि नदीत उडी घेतली, परंतु तिला वाचविण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App