महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगावर अखेर तिघा जणांची नियुक्ती, राज्यपालांचीही परवानगी

विशेष प्रतिनिधी

मुंबई – महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातील सदस्यांच्या रिक्त जागांवर देवानंद शिंदे, राजीव जाधव व प्रताप दिघावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, निवृत्त सनदी अधिकारी राजीव जाधव व निवृत्त आयपीएस अधिकारी प्रताप दिघावकर यांच्या नियुक्तीचा प्रस्ताव राज्य सरकारने राज्यपालांकडे पाठवला होता. राज्यपालांनी त्यास मंजुरी दिली.Three members deputed on MPSC board

वयाची ६२ वर्षे किंवा नियक्तीपासून सहा वर्षे असा या सदस्यांचा कार्यकाल असेल. लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही रोजगाराची संधी न मिळालेल्या स्वप्नील लोणकर या युवकाच्या आत्महत्येमुळे राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी लोकसेवा आयोगाच्या कारभारावर टीका केली होती.



त्यावेळी आयोगाकडून होणारी भरती प्रक्रिया गतिमान करण्यासह आयोगाच्या सदस्यपदाच्या रिक्त जागा ३१ जुलैपर्यंत भरण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. त्यानुसार तीन सदस्यांची नावे निश्चित करून ती फाइल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठविण्यात आली होती.

Three members deputed on MPSC board

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात
    Icon News Hub