रविवारी होणारी एमपीएससीची परीक्षा पुढे ढकला ; खासदार नवनीत राणा यांचं राज्यपालांना पत्र


वृत्तसंस्था

अमरावती : रविवारी (ता. 11 एप्रिलला)  एमपीएससीची महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट- ब संयुक्त पूर्व परीक्षा होणार आहे. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलवी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून केली.Postponed MPSC exams on Sunday; MP Navneet Rana’s letter to the Governor

नवनीत राणा यांनी पत्रात काय म्हटलं?

“कोरोनामुळे राज्यात परिस्थिती बिकट आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण राज्यात आहेत. दोन दिवसांपूर्वी एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूने इतर विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. आज एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.



पुण्यात अभ्यास करताना अनेक विद्यार्थी लक्षणे असणाऱ्या लोकांच्या संपर्कात आले आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आहेत. काही विद्यार्थ्यांना लक्षणे आहेत. मात्र,ते भीतीपोटी डॉक्टरकडे गेले नाहीत. परीक्षा झाल्यानंतर जाऊ असा ते विचार करत आहे. हे खूप भयंकर असून राज्य सरकारने गांभीर्याने विचार करावा.”

“मध्य प्रदेश, बिहार सारख्या राज्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्रात तर रुग्ण जास्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करुन परीक्षेसंदर्भात जो काही निर्णय असेल तो त्वरित जाहीर करावा. जेणेकरुन विद्यार्थ्यांना पुढील नियोजन करता येईल”, अशी विनंती खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

Postponed MPSC exams on Sunday; MP Navneet Rana’s letter to the Governor

 

 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात