मेसेजमध्ये लिहिले होते, ‘सर्व लोक…’
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशभरातील 41 विमानतळांवर बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले आहेत. बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे ई-मेल आल्यानंतर सर्वच विमानतळांवर घबराटीचे वातावरण होते. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, मंगळवारी देशातील 41 विमानतळांना बॉम्बची धमकी देणारे ई-मेल प्राप्त झाले. मात्र, विमानतळांवर बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आणि तासनतास तपास मोहीम राबविण्यात आली. संपूर्ण तपासात कुठेही बॉम्ब सापडला नाही, त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी ही कुणीतरी खोडसाळपणा केला आहे असे घोषित केले.Threat to bomb 41 airports across the country
या सर्व ४१ विमानतळांवर ज्या ई-मेल आयडीवरून संदेश आला होता तो ‘exhumedyou888@gmail.com’ नावाने तयार करण्यात आला होता. या सर्व विमानतळांना रात्री 12.40 च्या सुमारास ई-मेल प्राप्त झाले. सूत्रांनी सांगितले की, संबंधित बॉम्ब धमकीचा मेल मिळाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनीही सखोल तपास मोहीम राबवली आणि विमानतळांची कसून तपासणी करण्यात आली.
याशिवाय ‘केएनआर’ नावाच्या ऑनलाइन ग्रुपचाही या बनावट धमकीच्या ई-मेल्समागे हात असल्याचा संशय आहे. सूत्रांनी सांगितले की, ग्रुपने 1 मे रोजी दिल्ली-एनसीआरमधील अनेक शाळांना असेच ईमेल जारी केले होते. विमानतळांना मिळालेल्या ई-मेलमध्ये जवळपास असाच संदेश टाईप करण्यात आला होता. “हॅलो, विमानतळावर स्फोटके लपवून ठेवली आहेत. लवकरच बॉम्ब फुटतील. तुम्ही सर्व मराल.” सूत्रांनी सांगितले की, सर्व विमानतळांनी ही धमकी फसवी म्हणून फेटाळून लावली आणि प्रवाशांची वर्दळ सुरू ठेवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App