threat call for cm yogi adityanath : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खालिस्तान समर्थकाने गंभीर धमकी दिली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी दिली आहे की, 15 ऑगस्ट रोजी आम्ही सीएम योगी आदित्यनाथ यांना लखनौच्या विधान भवनात राष्ट्रध्वज फडकवू देणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी धमकीचा ऑडिओ प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आला आहे. threat call for cm yogi adityanath by khalistani leader pannu to not hoist flag on independence day
विशेष प्रतिनिधी
लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खालिस्तान समर्थकाने गंभीर धमकी दिली आहे. खलिस्तान समर्थक गुरपतवंत सिंग पन्नूने धमकी दिली आहे की, 15 ऑगस्ट रोजी आम्ही सीएम योगी आदित्यनाथ यांना लखनौच्या विधान भवनात राष्ट्रध्वज फडकवू देणार नाही. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी धमकीचा ऑडिओ प्रसारमाध्यमांना पाठवण्यात आला आहे. याबाबत दै. जागरणने सविस्तर वृत्त दिले आहे.
शीख फॉर जस्टिस या भारतातील बंदी घातलेल्या संघटनेच्या गुरपतवंत सिंग पन्नूने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासाठी पत्रकारांच्या फोनवर धमकी देणारा ऑडिओ टाकला आहे. ज्यामध्ये असे म्हटले आहे की, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 15 ऑगस्ट रोजी लखनौ विधान भवनात राष्ट्रध्वज फडकावण्याची परवानगी दिली जाणार नाही. गुरुपतवंत सिंग पन्नू, खलिस्तान समर्थक आणि शीख फॉर जस्टिस ऑर्गनायझेशन (एसएफजे) चा नेता असून त्याने गुरुवारी लखनौच्या पत्रकारांना +6478086308 या क्रमांकावरून कॉल करून ही धमकी पाठवली आहे. शीख फॉर जस्टिस गटाशी संबंधित गुरुपतवंत सिंग पन्नू म्हणाला की, योगी आदित्यनाथ यांना 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही. यापूर्वी पन्नूने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि हिमाचल प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जय राम ठाकूर आणि माजी मुख्यमंत्री शांता कुमार यांना धमकी दिली होती.
लखनौमधील काही पत्रकारांना 59 सेकंदांच्या रेकॉर्ड केलेल्या कॉलमध्ये गुरपतवंत सिंह पन्नू म्हणाला की, भाजप, आरएसएस आणि पीएम मोदी शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ त्यांना पाठिंबा देत आहेत. पन्नूने संदेशात म्हटले आहे की, यूपीच्या लोकांनी आणि शेतकऱ्यांनी यूपी सरकारला तिरंगा फडकवू देऊ नये. एवढेच नव्हे, तर तांडा, हरदुआगंज, पनकी, परिच्छा आणि इतर वीज प्रकल्प बंद करा. ऑडिओ संदेशात असेही म्हटले आहे की, सहारनपूर ते रामपूरपर्यंतचा भाग खलिस्तान बनल्यानंतर ताब्यात घेतला जाईल.
याआधी पन्नूने हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांना धमकी दिली होती की, 15 ऑगस्टला तिरंगा फडकवू देणार नाही. ऑडिओ संदेशात असेही म्हटले होते की, पंजाबनंतर तो हिमाचलवरही कब्जा करेल, कारण हिमाचलचा काही भाग पूर्वी पंजाबचा भाग होता. भारतात देशविरोधी कारवाया केल्याबद्दल 10 जुलै 2019 पासून शीख फॉर जस्टिस संघटनेवर बंदी आहे. असे असूनही खलिस्तानी देशातील शांतता भंग करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत.
threat call for cm yogi adityanath by khalistani leader pannu to not hoist flag on independence day
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App