मृतांचा आकडा 233 वर, 900 जखमी; मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर!!; रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री घटनास्थळावर
वृत्तसंस्था
बालासोर : ओडिशात आतापर्यंतच्या सर्वांत भीषण रेल्वे अपघातात प्रवाशांवर काळाने झडप घातली आणि एक दोन नाही तर तब्बल 233 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ओडिशातील बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या रेल्वे अपघातात मृतांची संख्या 233 झाली असून सुमारे 900 लोक जखमी झाले आहेत. मदत आणि बचाव कार्य युध्दपातळीवर सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः त्याचा आढावा घेत आहेत. मुंबई – मडगाव वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम रद्द केला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक घटनास्थळी पोहोचले आहेत.Thousands of blood donors flocked to various hospitals to help the injured in the Odisha train accident
सरकारी पातळीवर मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असताना सर्वसामान्यांनी देखील आपला मदतीचा खारीचा वाटा उचलायला सुरुवात केली आहे. ओडिशातल्या अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदान करण्यासाठी तरुणांची गर्दी होत आहे. रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढली असली तरी जखमींची संख्या त्यापेक्षा मोठी आहे. त्यामुळे जखमींवरील उपचारासाठी मोठ्या प्रमाणावर रक्ताची गरज आहे. ही गरज ओळखूनच अनेक संस्था पुढे येऊन तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन करीत आहेत. तरुणांनीही त्याला प्रतिसाद देत अनेक रुग्णालयांमध्ये रक्तदानासाठी गर्दी केली आहे.
#WATCH | Odisha CM Naveen Patnaik takes stock of the situation at the accident site in Balasore #BalasoreTrainAccident pic.twitter.com/PajWdqzkP4 — ANI (@ANI) June 3, 2023
#WATCH | Odisha CM Naveen Patnaik takes stock of the situation at the accident site in Balasore #BalasoreTrainAccident pic.twitter.com/PajWdqzkP4
— ANI (@ANI) June 3, 2023
रेल्वे अपघातातील मृतांची संख्या वाढत आहे. अपघातस्थळावरुन मिळालेल्या अहवालात हा आकडा 233 वर पोहोचली आहे. जखमींची संख्या 900 च्या आसपास आहे. ओडिशाच्या बालासोर इथे काल संध्याकाळी एक प्रवासी ट्रेन दुसर्या ट्रेनच्या रुळावरून घसरलेल्या डब्यांवर आदळल्याने हा भयंकर अपघात झाला.
#WATCH ओडिशा: बालासोर ट्रेन हादसे के बाद रक्तदान करने के लिए अस्पताल में स्थानीय लोगों की भीड़ देखने को मिली।#BalasoreTrainAccident pic.twitter.com/rsOjTcviPO — ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
#WATCH ओडिशा: बालासोर ट्रेन हादसे के बाद रक्तदान करने के लिए अस्पताल में स्थानीय लोगों की भीड़ देखने को मिली।#BalasoreTrainAccident pic.twitter.com/rsOjTcviPO
— ANI_HindiNews (@AHindinews) June 3, 2023
ओडिशातील बालासोर येथे शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसचे 10 ते 12 डबे रुळावरून घसरले आणि विरुद्ध रुळावर पडले. त्यामुळे यशवंतपूरहून हावडाकडे जाणाऱ्या आणखी एका रेल्वेचे डबे रुळावरून घसरल्याने अपघात झाला.
Odisha train accident: People queue up to donate blood for injured in Balasore Read @ANI Story | https://t.co/McDb1XajsF#Odisha #OdishaTrainTragedy #Balasore pic.twitter.com/DlIFwcZmns — ANI Digital (@ani_digital) June 3, 2023
Odisha train accident: People queue up to donate blood for injured in Balasore
Read @ANI Story | https://t.co/McDb1XajsF#Odisha #OdishaTrainTragedy #Balasore pic.twitter.com/DlIFwcZmns
— ANI Digital (@ani_digital) June 3, 2023
त्यातील तीन ते चार डबे रुळावरुन घसरले. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, रेल्वे रुळावरून घसरल्याच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री म्हणाले की, ‘अपघात दुर्दैवी होता, आणि त्यांच्या मंत्रालयाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच बचावकार्य सुरू झाले.’ एनडीआरएफ, ओडीआरएएफ आणि अग्निशमन विभागाच्या पथकांना बचावासाठी घटनास्थळी पाठवण्यात आले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App