विशेष प्रतिनिधी
चेन्नई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव लोकांच्या हृदयावर लिहिलेले आहे. जे पंतप्रधान मोदींवर टीका करतात ते अर्धवट आहेत. हे लोक चांगल्या गोष्टी बोलत नाहीत आणि इतरांचे ऐकायलाही तयार नसतात, अशी टीका ज्येष्ठ तमिळ अभिनेते आणि दिग्दर्शक भाग्यराज यांनी केली आहे.Those who criticise PM are born premature, Criticism of Tamil actor Bhagyaraj
चेन्नई येथील भाजप कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांच्या समवेत आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात भाग्यराज बोलत होते. भाग्यराज म्हणाले, चांगल्या योजना लोकांपर्यंत पोहोचणे ही पंतप्रधानांसाठी अभिमानाची बाब आहे. पंतप्रधान मोदींचे नाव लोकांच्या मनात कोरले जाते.
भारताला अशा दमदार पंतप्रधानाची गरज आहे. कठीण प्रसंगांना सामोरे जाणे खरोखरच अवघड असते. ते पंतप्रधान म्हणून कसे वागतात याची पर्वा न करता त्यांच्यावर निष्कारण टीका केली जाते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App